जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ

हिंगोली : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे १४४ कलम लागू केल्या संदर्भात बनावट पीडीएफ आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधला असता आपण अशा कुठल्याही पद्धतीचे आदेश दिले नसून यासंदर्भात पोलिस अधीक्षक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आज बुधवारी दुपारी सोशल मीडियावर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यामध्ये १४४ कलम त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यासंदर्भातचे आदेश दिल्याचे पीडीएफ  स्वरूपाची माहिती व्हायरल झाली. या आदेशामध्ये निर्गमित केलेल्या कुठल्याही स्वरूपाचे दिनांक शिवाय सदर आदेश कधीपासून केव्हापर्यंत लागू असतील या संदर्भाचे दिनांक नमूद नव्हते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी देखील नव्हती. परंतु अनेकांनी घाबरून हे आदेश सोशल मीडियात फॉरवर्ड केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे अनेकांनी यासंदर्भात कुठलीही खातरजमा न करता हे आदेश फॉरवर्ड केले. या संदर्भातची माहिती समजतात अनलायझरच्या प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अशा स्वरूपाचे कुठलेही आदेश यांच्यावतीने निर्गमित करण्यात आलेले नाहीत. शिवाय ही बाब निदर्शनास आल्यामुळे पोलीस अधीक्षक यांना कळविण्यात आली असून सायबर सेलच्या माध्यमातून अशा पद्धतीचे बनावट आदेश पसरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी भयभीत न होता अशा प्रकारच्या कुठल्याही बोगस आदेशावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.