१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस. काय आहे प्रकरण ?

1 min read

१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस. काय आहे प्रकरण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस. भाजपने यावर्षी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमित दंडुके: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस. भाजपने यावर्षी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. अन्नवाटप, मास्कवाटप, सॅनीटायझरवाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन भाजपच्या वतीने केले गेले आहे.
तर याउलट दुसरीकडे भाजप विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याच ठरवल आहे. याला सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुफान प्रतिसाद मिळत आहे.