सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यास निघाला राज ठाकरेंची पुरंदरेंना श्रद्धांजली

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु ते मला पितृतुल्य होते.

सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यास निघाला राज ठाकरेंची पुरंदरेंना श्रद्धांजली

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त कळताच राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच क्षेत्रातून अनेकांनीच हळहळ व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भावनिक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु ते मला पितृतुल्य होते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानादेखील वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं याबाबात त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे-जिथे पदस्पर्श झाला, तिथे- तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेले तिकडे जायची. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं म्हणत राज ठाकरे यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.