अंदमान निकोबारमध्ये भुकंपाचे तीव्र धक्के

1 min read

अंदमान निकोबारमध्ये भुकंपाचे तीव्र धक्के

कोणत्याही प्रकारची जीवीतहानी नाही.

अंदमान निकोबार: शनिवारी दुपारी अंदमान निकोबार येथे भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार रिश्टर स्केलवरती भुकंप 3.6 होता. सेंटर फॉर सीस्मोलॉजीने सांगितले की याचा केंद्रबिदू हा पोर्ट ब्लेअरच्या 143 किमी दक्षिण पूर्वेस होता. सुत्रांच्या माहीतीनुसार भुकंपाचे झटके हे दुपारी 12 वाजुन 30 मिनिटांनी जाणवले.यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी तसेच नुकसान झाले नाही.