शाहरूख खानच्या बॉलीवूड कारकिर्दीला २९ वर्ष पूर्ण

शाहरूख खानच्या बॉलिवूड कारकिर्दीला २९ वर्ष पूर्ण झाल्याने शाहरूखने सर्वांचे आभार मानले आहे.

शाहरूख खानच्या बॉलीवूड कारकिर्दीला २९ वर्ष पूर्ण

मुंबईः बॉलीवूडचा किंग शाहरूख खान याला बॉलीवूडमध्ये २९ वर्षे पुर्ण झाली आहेत. शाहरुख खान २५ जून १९९२ पासून या इंडस्ट्रीवर राज्य करतो आहे. किती आले किती गेले.अनेकांसोबत त्याला स्पर्धा करावी लागली. पण जवळपास २९ वर्षं त्याने आपले स्थान बॉलिवू़ड मध्ये कायम ठेवले आहे.

२५ जून १९९२ रोजी शाहरुख खान याने ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात शाहरुखबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती मुख्य भूमिकेत होते. टीव्हीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर शाहरुखने या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. त्याचा ‘दीवाना’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानंतर शाहरुखने केलेले अद्भुत काम आजतागायत सुरूच आहे. शाहरुखला आज बॉलिवूडचा ‘बादशहा’ म्हटले जाते.

शाहरुख खान बॉलिवूडमध्ये येऊन आता २९ वर्षं झाली असली तरी मनोरंजन क्षेत्रात येऊन त्याने तिशी कधीच ओलांडली आहे. कारण त्या आधी तो सर्कस, फौजी अशा मालिकाही करत होता. ही गोष्ट सर्कस या मालिकेची आहे. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेते मकरंद देशपांडेही काम करत होते. आज मकरंद देशपांडेही मोठ्या स्तरावर पोहोचले आहेत. अनौपचारिक गप्पांमध्ये बोलता बोलता सर्कसचा विषय निघाला आणि शाहरुखचा. त्यावेळी बोलताना मकरंद म्हणाले, "शाहरुख खान तेव्हाही शाहरुख खान होता".

बॉलिवूडमध्ये २९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आता शाहरुख खानने आपल्या चाहत्यांसाठी एक खास संदेश लिहिला. शाहरुखने लिहिले की, ‘तुम्हाला तुमचे प्रेम २९ वर्षांपासून मिळत आहे आणि आजही तुमचे ही प्रेम अबाधित आहे. माझ्या आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन केले आहे, हे आज लक्षात आले. मी वेळात वेळ काढून सर्वांचे आभार मानणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची खूप गरज आहे…’


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.