शेख अल्ताफची विकृती  वैष्णवीचा चिरला गळा

1 min read

शेख अल्ताफची विकृती वैष्णवीचा चिरला गळा

मंठ्यातील शेख अल्ताफचे गल्लीतील एका तरूणीवर प्रेम जडले. तिचे लग्न झाले आणि ती आपली होत नाही हे लक्षात येताच मांडवपरतनीसाठी आलेल्या तरूणीचा भर बाजारपेठेत त्याने भोसकून खुन केला.. काय आहे. ही विकृतीची कहाणी नक्की वाचा..

मंठा.. जालना जिल्ह्यातील नांदेड महामार्गावरचे गाव. गाव कसले छोटेसे शहरच या शहरातील एका भागात वैष्णवी गोरे ही आपल्या मातापित्यासह राहत होती. ज्या भागात ती राहत होती तेथील अनेक लोक मंठा शहरातच पण अन्यत्र वस्तीला गेली. त्या गल्लीतील लोकांनी नव्या भागात जाताना आपली जुनी घरे विकून टाकली. बहुतेक घरांची खरेदी त्याच गावातील मुस्लीम समाजाने केली आहे. आता हिंदु वस्ती असलेल्या भागात दोनचार घरे हिंदूंची उरली असतील. दोन माळी समाजाची एक मराठा आणि एक ब्राह्मण समाजाचे असे चार घरेच हिंदू घरे म्हणून या गल्लीत उरली आहेत.
या चार घरांपैकी एक घर वैष्णवी गोरे हिचे होते. वैष्णवीचे वडील नारायण गोरे हे मिस्त्री काम करून आपल्या कुटूंबाची गुजराण चालवतात. या गल्लीत मुस्लीम तरूणांचे टोळके सतत कट्यावर बसलेले असते. येणा-या जाणा-या मुलींची छेड काढणे हाच त्यांचा दिवसभरातील उद्योग असतो. याच टोळक्यातील शेख अल्ताफ शेख बाबू याची नजर वैष्णवीवर होती. तो तिची सतत छेड काढत होता. शेख अल्ताफ हा आपल्या मुलीची छेड काढतो याची माहिती नारायण गोरे यांना मिळाल्यावर नारायण गोरे यांनी अल्ताफला चांगलेच फैलावर घेतले होत. या गल्लीत आपले लेकरू सुरक्षीत राहिल की नाही ही शंका आणि चिंता नारायण गोरे यांच्या मनात होती. शेख अल्ताफ शेख बाबू हा शाळेत जाता येता वैष्णवीची छेड काढत होता. म्हणूनच त्यांनी वैष्णवीचे लग्न करून देण्याचे ठरवले. पोरीची आणि आई वडीलांची शिक्षणाची इच्छा असतानाही ते थांबवून लग्न करायचे नक्की केले. जालना येथील चांगले स्थळ बघून त्यांनी २४ जुन रोजी लॉक डाऊनचे नियम पाळत वैष्णवीचा विवाह करून दिला.
IMG_20200702_125216-2
वैष्णवीचा लग्नातील फोटो

लग्नानंतर चार दिवसात वैष्णवी मांडव परतनीसाठी आपल्या माहेरी आली. आणि यातच तिचा घात झाला.
वैष्णवीचे लग्न झालेले पाहुन शेख अल्ताफ शेख बाबू चवताळला होता. जी आपली झाली नाही तिला कोणाचीच ङोऊ द्यायचे नाही हे अल्ताफने ठरवले होते. मंगळवारी तारीख ३० जुन रोजी वैष्णवी तिची एक मैत्रीण आणि आई बाजारात खरेदीसाठी गेल्या. माहेरी आलेल्या लेकीला साडी घेण्यासाठी आई त्यांना घेऊन साडीच्या दुकानात गेली होती. करेदी पूर्म झाल्यावर आई ( अश्विनी गोरे) यांनी वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीला घराकडे पाठविले. घराकडे जात असतानाच रस्त्यातच पाठीमागून आलेल्या तरूणाने वैष्णवीच्या मानेवर हातावर धारदार चाकुचे वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैष्णवीला तसाच टाकून तो तरूण पसार झाला.
IMG-20200702-WA0007
याच ठिकाणी झाली हत्या

सायंकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेच्या रस्त्यावरच हा प्रकार घडत होता. एकतर्फी प्रेमाने आंधळ्या झालेल्या शेख अल्ताफने वैष्णवीचा बळी भर बाजारपेठेत घेतला होता.
IMG-20200702-WA0005
असे रक्त सांडले होते

वैष्णवी ज्या भागात राहते त्या भागात हा प्रकार सतत घडत असतो. मुस्लीम समाजाच्या तरूणांचे टोळके सतत या भागातून जा ये करणा-या मुलींना छेडत असते. अशी पालकांची तक्रार आहे. पण संख्येने अधिक असल्याने कोणी याविरूध्द धाडसाने बोलताना अथवा मज्जाव करण्याची हिंमत करताना दिसत नाही.
वैष्णवीवर हल्ला झाल्यानंतर तिच्या आई वडीलांनी हे कृत्य त्याच मुलाचे असल्याची तक्रार केली आणि पोलीस अल्ताफचा शोध घेऊ लागले अवघ्या थोड्याच वेळात या मुलाने देखील विष पिल्याची माहिती पोलीसांना मिळाली. अल्ताफला आता जालण्याच्या शासकीय रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपीला कडक शासन व्हावे- लोणीकर
अशा विकृत आणि वासनांध आरोपीला बरे करून त्याच्यावर ताकदिने खटला चालावावा. वेगवान खटला चालवून अशी निघृण हत्या करणा-या आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री व या भागाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. तसेच मंठा शहरात अशा छेडछाडीच्या घटना घडत असतील तर पोलीसांनी त्याला त्वरीत पायबंद घालावा अशा सूचना देखील लोणीकर यांनी केल्या.