मतांसाठी नेत्यांनी सोडल्या लाजा

नेत्यांनी बांधले नव्हते मास्क

मतांसाठी नेत्यांनी सोडल्या लाजा

औरंगाबादः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला असला तरी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढत असताना बेजबाबदार नागरिकांकडे बोट दाखवले जाते. पण आता राजकीय नेतेच बेजबाबदार पणे वागत आहेत.

औरंगाबादेत ११ मार्च पासुन कोरोना आटोक्यात आण्यासाठी अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला. तसेच नियम देखील लावण्यात आली.या नियमानूसार राजकीय कार्यक्रम, सभा, मंगल कार्यालयात लग्न लावण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. पण सगळे नियम तोडत आज पैठणच्या ढोरकीन येथे राजकीय नेत्यांनी जिल्हा बँक निवडणुकीचा मेळावा घेतला. मेळाव्यात नेत्यांनी मास्क बांधला नव्हते, डिस्टन्सिंगही नव्हते राजकीय नेतेच नियमांचे पालन करत नाही. नागरीकान कडून अपेक्षा करतात. शिक्षण ऑनलाईन सुरू आहे, परीक्षाही ऑनलाईन होत आहेत,जळगाव महापौर,उपमहौपरपदाची निवडणूक ऑनलाईनच पार पडली. मग या नेत्यांना प्रचार ऑनलाईन करायला काय हरकत आहे असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. एकिकडे मोठा मेळावा होतो आहे. नियमांचे उल्घन होते आहे. तरी सरकार काही करत नाही. नियम हे फक्त नागरीकान साठीच आहे काय? राजकीय नेत्यांन साठी नाही काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.