लक्षवेधी ठरतेय शरद केळकरची भूमिका !

1 min read

लक्षवेधी ठरतेय शरद केळकरची भूमिका !

शरद केळकरने चित्रपटात दमदार भूमिका बजावली आहे आणि त्याची एन्ट्री पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले

सुरुवातीपासूनच शिर्षकाने वादग्रस्त राहीलेला आणि नुकताच रिलीज झालेला अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' या चित्रपटाला प्रेक्षकांची काही प्रमाणात पसंती मिळत आहे. अक्षय कुमार लीड रोल मध्ये असलेल्या या चित्रपटात अक्षयमुळेच चित्रपट चर्चेत राहिला. प्रमोशन आणि ट्रेलर दरम्यान कोणत्याही कलाकाराचे नाव घेण्यात आले नाही. अभिनेता शरद केळकर हा सिनेश्रुष्टीतील प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. मात्र तरीही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो कुठेही दिसला नाही, प्रमोशनच्या वेळी त्याचे नाव घेण्यात आले नाही. शरद केळकरने चित्रपटात दमदार भूमिका बजावली आहे आणि त्याची एन्ट्री पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. त्याच्यामुळॆ का होईना रसिक काही काळ पडद्यावर खेळून राहतात.