शरद पवार महाराष्ट्राचे राजकारण चालवतात असे म्हटले जाते. ते विनोदाने नाही तर खरेच आहे. लोकवंदता ही अनुभवातून येत असते. कोण मोठे व्हावे आणि कोण छोटे व्हावे ही तो पवारांची मर्जी असते. कोथरूड द अनटोल्ड स्टोरीमधून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. पवारांच्या मर्जीतील माणूस आज भाजपाचा प्रदेशाध्यक्ष आहे. हे वास्तव आपल्या समोर येईल..
तारिख १ ऑक्टोबर २०१९
स्थळः कोथरूड पुणे
वेळ सकाळी साडे सहा वाजताची
पेपरवाला सकाळीच दारात पेपर टाकून जातो. त्या घरातील स्त्री चहाच्या घोटासोबत पेपर हातात घेऊन वाचत असते. मुख्य बातमी बघून पहिल्यांदा आश्चर्य नंतर संताप आणि त्यानंतर अश्रु अशी अवस्था येते. ती बातमी खरेतर त्या स्त्रीसाठी मानसिक धक्का असते. ती बातमी असते. भाजपाच्या उमेदवारीची आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जाहीर झालेली असते. आणि ती स्त्री असते. कोथरूडची त्यावेळेसची आमदार सौ मेधा विश्राम कुलकर्णी..
ही कथा सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण हे घडले कसे? आणि घडवले कोणी? हे समजून घेणे मात्र रंजक आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील वरिष्ठांच्या मर्जीतील असलेले चंद्रकांत पाटील. राज्यातील नेत्यांची सोय असलेले चंद्रकांत पाटील मंत्रीमंडळातील हेवीवेट नेते चंद्रकांत पाटील असे अचानक सुरक्षीत मतदार संघात कसे आलेय़ एवढ्या बलशाली नेत्याला सुरक्षीत मतदारसंघ का शोधावा लागला?
मोदींची लाट वर महाजनादेश यात्रेचे वारे दादांना विजयाची खात्री देत होते. पण कोल्हापूरच्या पुराने वारं फिरवले. पुराच्या काळात महाजनादेश यात्रेच्या रथावर स्वार झालेले दादा खाली उतरून कोल्हापूरात गेलेच नाही. कोल्हापूरचा पूर ओसरला आणि दादांची लोकप्रियता देखील ओसरली. कोल्हापूरातून दादा कसेच निवडून येत नाहीत हे सगळ्या सर्वे एजंसीचे रिपोर्ट होते. आणि अशा स्थितीत दादासाठी सुरक्षीत मतदारसंघाचा शोध सुरू झाला आणि तो थांबला कोथरूडवर.
कोथरूडचा निर्णय ‘सर्वांगाने बोलणी’ करून घेतलेला होता.सर्वांगाने आणि बोलणी हे दोन शब्द जाणिवपूर्वक वापरत आहे. ते का हे तुम्हाला पुढे वाचतानाच समजेल.
आपण मुळ घटनेकडे जाऊ.
दादांना उमेदवारी घोषीत झाली. कोथरूडमध्ये उमेदवारी कापलेल्या आमदाराचे आडनाव कुलकर्णी होते. आणि ब्राह्मण नेतृत्वाला भाजपा गृहीत धरतेय असा समज कोथरूडमध्ये वाढीला लागला होता. ब्राह्मण महासंघाच्या वतीने तर एका उमेदवाराच्या नावाची घोषणापण करण्यात आली.
ब्राह्मण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल तर निवडणुक सोपी राहणार नाही असे रिपोर्टस पण दादांना मिळू लागले होते. ज्या महासंघाच्या व्यक्तींना सत्ता असतानाच्या काळात पाच मिनिटे सुध्दा वेळ दिला गेला नाही त्याच महासंघाच्या व्यक्तींची भेट घेण्याची तत्परता चंद्रकांत पाटील यांनी दाखवली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील मतांची फाटाफुट नको म्हणत मनसेच्या उमेदवाराला पाठींबा दिला. आणि महासंघाचा उमेदवार प्रसिध्दीची हौस भागवून उमेदवारी अर्ज मागे घेणार हे स्पष्ट होऊ लागले.
याच काळात एक व्यक्ती जो निवडडणुकीच्या रिंगणात उतरेल असे भाजपाच्या ध्यानीमनी देखील नव्हता तो दादांना टक्कर देण्याची तयारी करू लागला. मागील पंधरा वर्षात ज्यानी समाजाच्या अनेक उपक्रमात सहभाग घेतला होता. ते विश्वजित देशपांडे निवडणुक लढण्याची तयारी करत होते. या देशपांडे यांची ओळख सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या चळवळीमुळे सर्वांना आहेच. या चळवळीला खुल्या वर्गात मिळणारा वाढता पाठिंबा या निवडणुकीत परिणामकारक ठरणारा होता. लोकांची निवडणुक लढवा ही भावना ही राजकीय नव्हती तर भावनिक पातळीवरची होती. आणि राजकारण केवळ भावना आहे म्हणून करता येत नसते. तर ते वास्तविकतेवर करावे लागते. देशपांडे यांना राजकीय सल्लागार ( जे अनेक आमदार आणि खासदार मंडळीसाठी राजकीय सल्लागार म्हणून काम करतात) ओंकार जोशी यांच्याशी संपर्क साधला.
ब्राह्मण उमेदवाराची उमेदवारी कापल्यामुळे तयार झालेला रोष, सोशल मिडीयाची मदत, माध्यम जगतातून तयार होणारे वातावरण, पाहता निवडणुक लढवायला हरकत नाही. तोडी आर्थिक रसद उभी करावी लागेल असा निष्कर्ष पुणे बेंगलोर रस्त्यावरील एका पंचतारांकीत हॉटेलात झालेल्या बैठकीत निघाला. शिवाय अदृश्य हात मदत करतील हा विश्वास देखील होता. देशपांडे यांनी आपली उमेदवारी घोषीत केली.
ब्राहमण बहुल आणि भाजपाचा गड असलेल्या मतदारसंघात भाजपाच्या अध्यक्षासमोर आव्हान उभे राहू नये यासाठी भाजप वर्तुळातून देशपांडे यांच्या मिनतवा-या सुरू झाल्या. संघपरिवारातून देखील देशपांडे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. पण व्यर्थ
देशपांडे असे मान्य होत नाहीत म्हणून याच काळात कोथरूड मधील कांही हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांना जामिन अथवा पॅरोलवर तुरूंगाबाहेर काढण्यात आले. ते बाहेर आल्याची माहिती देशपांडे यांच्या पर्यत पोहचवल्या गेली. पण व्यर्थ देशपांडे यांचा निर्णय कायम होता.
तो निरोप आला...
हे सगळं महाभारत सुरू असताना एक व्यक्ती इंदापूरातून देशपांडे यांना भेटायला आली. आणि निरोप देऊन गेली. अनेक निरोप देशपांडे यांना मिळत होती. त्यात हा एक निरोप पण हा निरोप कांही साधासुधा नव्हता. निरोप होता,”मोठ्या साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलावले आहे.” निरोप देणारी व्यक्ती देखील कोणी ऐरीगैरी नव्हती तर त्या होत्या पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे.
भेट गोविंदबागेत ठरली. उत्साहात देशपांडे आणि त्यांचे सहकारी गोविंदबागेकडे निघाले. पण प्रवासात उशीर झाला. साहेब गोविंदबागेतून निघाले होते. पण निरोप ठेऊन गेले होते. बारामती विमानतळावर वाट बघतोय. साहेबांना निघण्याची घाई होती. कसेबसे देशपांडे विमानतळावर पोहचले. बोलणे झालेच नाही पण कोथरूडचा विषय आहे. हे समजले. आणि साहेब हेलीकॉप्टरमध्ये बसले.
साहेब जाऊन थोडाच वेळ झाला असेल तेवढ्यात सिल्व्हर ओकच्या नंबरवरून नागवडे यांच्या मोबाईलवर फोन आला. दुस-या दिवशी सातारा येथे भेटू.
साहेबांच्या सुचनेनुसार देशपांडे साता-यात पोहचले. हॉटेल प्रीती एक्झीकेटीव मध्ये भेट ठरली. देशपांडे साता-यात पोहचले. निरोप गेला. तिथे अगोदरच शशीकांत शिंदे व अन्य लोक हजर होती. साहेबांना निरोप गेला. आणि साहेबांनी देशपांडेना आत बोलावून घेतले.
बैठक जवळपास चाळीस मिनिटे चालली. सगळीच चर्चा सांगता येऊ शकेल. पण त्यातील चार वाक्य महत्वाची होती. याच चार वाक्याचा धक्का देशपांडे यांना बसला. देशपांडे बाहेर पडले थेट दुस-याच दिवशी त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याबाबतचे कळवले.
काय होती ती वाक्य.. त्या वाक्याचा अर्थ तरी काय?
साहेब म्हणाले होते त्यातून राजकारणातील पडद्याआडची मैत्री, हितसंबंध आणि डावपेच होते. कांही खेळी होत्या...
साहेब बोलले होते. “कशाला लढताय कोथरूडची निवडणुक अवघड आहे ती जागा येणे. आम्हाला कोथरूड मध्ये रस नाही.”
साहेबांना त्यावेळी कोथरूड मध्ये रस नव्हता तर रस फक्त कर्जत मध्ये होता. कर्जत मधील मंत्र्याची जागा पराभुत झाली तरी भाजपाला कांही फरक पडणार नव्हता. त्याबदल्यात अध्यक्षाची जागा सेफ होणार होती.
साहेबांना देखील कर्जत आणि दादा दोघेही निवडून येण्यात हीत आहे हेच वाटत होते. म्हणूनच भाजपाच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभा करू शकणारा ब्राहमण उमेदवार त्यांनी हटवला होता.
कर्जत जामखेड द्या कोथरूड सहज घ्या असे म्हणत या जुण्याच नात्याचे नवे बारसे झाले होते. याबाबत आम्ही विश्वजीत देशपांडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला पण देशपांडे म्हणाले, “ मी कांही पूर्णवेळ राजकारणी नाही. तो विषय आता संपला आहे. मी कांहीच बोलणार नाही. पवार साहेब आणि माझी भेट होतच असते.”
दादा निवडून यावेत असे साहेबांना का वाटत होते. कट्टर विरोधी पक्षाचा अध्यक्ष आमदार व्हावा अशी साहेबांची इच्छा होती म्हणूनच त्यांना विरोध करणारे लोक साहेब बाजुला करून त्यांचा मार्ग निष्कंटक करत होते. साहेबांनी स्वयंस्विकृत केलेले हे कार्य अखेर पार पडले. कोथरूडच्या चंपा चौकात अखेर साहेबांच्या मर्जीचा झेंडा फडकत होता.
आपण मात्र चर्चा करत राह्यची निष्ठा, पक्ष, विचारधारा वगैरे वगैरे....
शरद पवारांचा माणुस भाजपचा अध्यक्ष?
शरद पवारांच्या मर्जीतला माणुस भाजपचा अध्यक्ष आहे का? कोथरूडच्या चंपा चौकात शरद पवारांचाच झेंडा फडकतो आहे का? विधानसभा निवडणुकीत नेमके काय घडले? पडद्या आड घडलेली कोथरूडची अनटोल्ड स्टोरी

Loading...