शरद पवार ठरले अपयशी

शरद पवार- भाग ४ या सगळ्या प्रकारानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ज्यात आधी बहुमत गमावलेल्या काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वाच निवडणुक लढवून यावेळी चक्क सत्ता गमावली. शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं.

शरद पवार ठरले अपयशी

महाराष्ट्रः १९८८ ला शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचा मुख्यमंत्री केलं गेलं. १९८६ ला औरंगाबादच्या आमखास मैदानावर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जीत करण्याचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता. पुढे शंकरराव चव्हाणांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आलं आणि पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं गेलं. १६८ जागांवर असलेलं काँग्रेस आणि शरद पवारांचे ४४ आमदार अशी दोनशेच्या वर काँग्रेसच्या आमदारांची संख्या होती. २२२ आमदारांची संख्या काँग्रेसला १९७२ च्या निवडणुकीत मिळवता आली होती, तीच १९८८ ला मिळवता आली होती. परंतु १९९० ला निवडणुका झाल्यावर किमान २०० जागा तरी काँग्रेसच्या येणं अपेक्षित होतं मात्र काँग्रेसने आपलं बहुमत गमावलं. शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपली निवडणुक लढवली आणि काँग्रेसला आपलं बहुमत गमवावं लागलं. १४१ जागा काँग्रेसच्या निवडुन आल्या, बहुमतासाठी आवश्यक असलेला १४५ चा आकडाही काँग्रेसला पार करता आला नाही. हे पवारांच्या बुलंद नेतृत्वाचं उत्कृष्ट उदाहरण मानावं लागेल.

समाजवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर जे सरकार तयार झालं होतं ते पाडून, ३८ आमदारांना फोडून, पुलोद निर्माण करुन शरद पवारांनी सरकार स्थापन केलं. पुलोद म्हणून निवडणुक लढवली, पवारांना केवळ ४४ आमदार निवडुन आणता आले. याचं काही खरं नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये उडी मारली. आता काँग्रेस सशक्त होईल, काँग्रेसला पुर्ण बहुमत मिळेल अशी अपेक्षा असताना, पवारांच्या नेतृत्वात निवडणुक लढुन देखील काँग्रेसला बहुमताजवळ जाता आलं नाही. १४१ जागा आल्या, पुढे ४ जागांची व्यवस्था पवारांनी केली. काही राजकारणी लोक असंही सांगतात की पवारांची हीच चालाखी होती, पवारांना स्पष्ट बहुमत नको होतं. स्पष्ट बहुमत आलं असतं तर पवारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होता आलं नसतं. हेतू कोणताही असो पण एका मोठ्या नेत्याला आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवुन देता आलं नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्र नाकारु शकणार नाही.

स्वतः चा पक्ष काढल्यावर ३८, नंतर ४४ आणि आपल्या मुळ पक्षात परत आल्यावर १४१ ही पवारांच्या नेतृत्वची क्षमता होती. १४१ जागा आल्यावरही पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बहाल केलं गेलं कारण पुन्हा राजकारणातली समिकरणं बददली होती. राजीव गांधींच्या नेतृत्वातील सरकार पडलं होतं, त्यानंतर बी.पी सिंग याचं आणि पुढे चंद्रशेखरांच सरकार आलं होतं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात राजीव गांधींचा मृत्यु झाला आणि नरसिंहराव नेता म्हणुन आले होते. या सगळ्या उलाढालीत शरद पवारांना महराष्ट्राचं नेतृत्व बहाल केलं गेलं. काही काळ पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन राहीले, पुढे ते केंद्रात संरक्षण मंत्री बनुन गेले. मुंबईत दंगली झाल्या कारण बाबरी मशीद पडली होती. त्यानतंर मुंबईतली अशांत परिस्थिती बघुन सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्रीपदावरुन बाजुला करुन पुन्हा पवारांना महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. १९९० ते १९९५ या काळात या सगळ्या गोष्टी घडत होत्या. शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले, मुंबईतील बाँम्बस्फोटाची परिस्थिती पवारांनी उत्तमपणे हाताळली असं सांगण्यात आलं. भुकंपामध्ये पवारांनी उत्तम काम केलं असं आजही सांगितलं जातं.

या सगळ्या प्रकारानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ज्यात आधी बहुमत गमावलेल्या काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वाच निवडणुक लढवून यावेळी चक्क सत्ता गमावली. शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं. मनोहर जोशी मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले, पुढे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. शरद पवार मात्र आपल्या पक्षाला सत्ताही मिळवून देऊ शकले नाहीत.  १९९५ साली काँग्रेसची एकहाती सत्ता गेली आणि पवारांना पक्षात घेतल्याचं काय फळ मिळु शकतं याची जाणीव काँग्रेसला झाली. पुढे १९९९ पर्यंत हे सरकार टिकलं. केंद्रात अटल बिहारी बाजपेयींच १३ महिन्यांच सरकार होतं, त्या सरकार सोबत निवडणुका घेतल्या तर आपल्याला यश मिळेल अशी धारणा भाजप सेनेची होती. पण तसं घडलं नाही, भाजप सेनेला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. परंतु या काळामध्ये अजून एक उलथापालथ महाराष्ट्राच्या राजकारणात घडली होती. सोनीया गांधींचं नेतृत्व स्विकारायला पवारांनी नकार दिला होता. राष्ट्रीय नागरीकत्व, विदेशी मुद्दा यावरुन पवार पेटुन उठले होते. संघमा, तारिक अनवर आणि पवार यांनी 'संताप' काँग्रेस स्थापन केली आणि याला "राष्ट्रवादी काँग्रेस" असं नाव मिळालं.

या पक्षाच्या वतीने निवडणुका लढवत पवार पुढे येत होते. १९९५ च्या काळात पवारांवर आणखी काही महत्त्वाचे आरोप होऊ लागले होते. भुखंडाचं श्रीखंड केल्याचा आरोप गोपीनाथ मुंडेंनी केला होता. त्यानंतर मोहरा समितीचा अहवाल आला होता, त्यात पवारांचे अंडरवर्ल्डशी संंबंध असल्याच सांगण्यात आलं होतं. अगदी विमानात दाऊदची माणंस असल्याचंही सांगितलं गेलं. या सगळ्या प्रकारानंतर पवारांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष स्थापन केला. परंतु दोन वेळा नेतृत्व असुनही पवारांना आपल्या पक्षाला बहुमत मिळवुन देता आलं नाही. पवार हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक अपयशी नेते होते. इथुनच काँग्रसच्या ख-या अधोगतीला सुरुवात झाली होती.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.