शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना -गोपीचंद पडळकर

1 min read

शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना -गोपीचंद पडळकर

शरद पवारांची बहुजन समाजावर अन्याय करण्याची भूमिका –गोपीचंद पडळकर

पंढरपुरः शरद पवारांनी राज्याचे नेतृत्त्व केलं पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी जहरी टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

"शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. मागील बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावं लागेल. आमचीही केस कोर्टात चालू आहे. पण त्यासाठी सरकारने पैसे दिले नाहीत." असे पडळकर म्हणाले.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीनाथ पडळकर हे मोठ्या उंचीचे नेते आहेत आणि अशा लोकांचा मानसिक तोल कधीकधी ढासळतो. शरद पवारांना विचारधारा नाही, व्हिजन नाही, असं बोलण्याची हिंमत विरोधकांनाही कधी झाली नाही. ज्या माणसाने धनगरांचा विश्वासघात केला. क्षणभर प्रसिद्धीसाठी कुठल्याही पातळीवर घसरायचं हे काम भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी केलं आहे. भाजपसारख्या मनुवादी पक्षात हा बहुजन नेता करतो काय? गोपीचंद पडळकर यांनी आपली वक्तव्य सांभाळून करावीत. याचे परिणाम गंभीर होती. जनमानसात क्षोभ निर्माण होईल. त्यामुळे तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल. अशा लोकांबद्दल न बोललेलं बरं, महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.