नवी दिल्ली: राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड संतापले आहेत. राज्यसभेच्या उपाध्यक्षाचं वर्तन सदनाचं अवमूल्यन करणारं आहे. त्याविरोधात मी आज एक दिवसासाठी अन्नत्याग करणार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
कृषीविधेयक बिलावरून राज्यसभेत सदस्यांना दिलेल्या वागणुकीवरून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवशं नारायण सिंह यांचं संपुर्ण वर्तन सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारं आणि अवमूल्यन करणारं आहे. त्यामुळे मी स्वत: निलंबित खासदारांच्या उपोषणात भाग घेऊन एक दिवसासाठी अन्नत्याग करणार आहे, असं पवारांनी सांगितलं.
शरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या विरोधात पवारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग.

Loading...