शरद पवारांच्या कोलांटउड्या

वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना व्ही फॉर व्हीआयपी असे न समजता रोमन मधील पाच समजणारे पवार, निधी चौधरींचा उपहास न समजणारे शरद पवार आणि इव्हीएम बाबत सतत आपली भुमिका बदलणारे शरद पवार यांच्या विषयात व्ही म्हणजे वृध्दापकाळ आल्याचे लक्षण तर सांगत नाही ना! अशी शंका येऊन जाते.

शरद पवारांच्या कोलांटउड्या

शरद पवारांना झालय तरी काय ?
रोज एक नवीन विधान ते कालच्यापेक्षा वेगळं आणि चक्क विरोधी स्वरूपाचे. आपल्याच पहिल्या भुमिकेला छेद देत बोलत राहणे. पहिल्यांदा पवार असे करत होते. पण त्याला राजकीय डावपेचांची मांडणी असायची आता पवार जे पेच टाकत आहेत त्यात त्यांचा डाव कमी दिसतो आहे आणि त्यात त्यांचाच पेच अधिक होत असल्याचे दिसत आहे.
घटना पहिली..
अगदी ताज्या प्रसंगापासून सुरू करू.. पुण्यातील भोसरी येथे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवारांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून कांही शिकावे असे सांगितले. अर्थात पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वात जास्त विरोध कोणाचा करत असतील तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा करतात. चड्डीवाले, ब्राह्मणी असा उपहास करताना देखील दिसतात. त्याच कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यपध्दतीमधून धडा घेण्याचा मंत्र पवारांनी दिला आहे. याच शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना त्यांनी संघाची हाफ पँट घालू नये एवढीच अपेक्षा अशी टिका लोकसभा निवडणुकीत केली होती. निवडणुक संपली आणि पवार बदलले.
घटना दुसरी
सध्या पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव असलेल्या निधी चौधरी या मुंबई महापालीकेत उपायुक्त असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेले ट्विट समजून न घेता त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्रच मुख्यमंत्र्यांना देऊन टाकले. निधी चौधरी यांचा उपहास जितेंद्र आव्हाड यांना समजला नाही आणि पवारांनी देखील एका गांधीवादी अधिका-याला त्यांची गांधी विचारावरची निष्ठा उगाच सिध्द करत बसावे लागले आणि प्रसार माध्यमांना एक विषय मिळाला.
घटना तिसरी
शरद पवार यांनी मोदी यांच्या दुस-या पर्वाच्या शपथविधीला जाण्याचे टाळले. इंग्रजी v अक्षरातील रांग मिळाली. याला रोमन लिपीतील व्ही समजून पाचव्या रंगाचा पास मिळाल्याचा समज झाला. आणि पवार यांनी शपथविधीत सहभागी होण्याचे टाळले. प्रसार माध्यमांनी याला महाराष्ट्र आणि शऱद पवार यांचा अवमान अशी मांडणी केली. राष्ट्रपती भवनाचे अधिकारी श्री अशोक मलीक यांनी याबाबत खुलासा करत गैरसमज झाला असल्याचे म्हटले. वास्तविक सर्व व्ही रांगेतील पासधारक हे पहिल्या vvip रांगेत होते. आणि पवारांसाठी याच रांगेतील खुर्ची आरक्षीत असल्याचे राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाचव्या रांगेबाबत गोंधळ घालणारे तोंडघशी पडले. आणि शरद पवार यांची नाराजी गैरसमजातून झाली असल्याचे स्पष्ट झाले.
घटना चौथी
शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात बाबासाहेब आंबेडकर यांच्या उर्जा धोरणाचा उल्लेख केला आहे. ,
“ परकीय कंपण्याना राज्यात पाऊल का ठेवू दिलं, असा मुद्दा उपस्थिती करून राजकीय हल्ला केला. प्रकल्पामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे., हा प्रकल्प आणताना भ्रष्टाचार झाला आहे. अशी टिका सुरू केली. आम्ही सत्तेत आलो, तर एनरॉन समुद्रात बुडवू! असं शिवसेना भाजपनं जाहिर करून टाकलं1995 च्या निवडणुकीत एनरॉन हा महत्वाचा मुद्दा झाला.शिवसेना भाजपने एनरॉनच्या मुद्यावर रान उठवलं. या प्रकल्पाला निमंत्रण देताना त्यात भ्रष्टाचार झाला आहे, असे बेछुट आरोप केले.”
(वाचा लोक माझे सांगाती,प्रकरण उद्योगाची नवी घडी आणि एनरॉन पा.क्र127)
आणि नाशीक मधील वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शुभारंभात बोलले ते याच्या विरूध्दच होते. शरद पवार याच विषयात दिवंगत मुंडे यांचे कौतुक करत आपल्याच पुस्तकातील मते खोडत आहेत हे विशेष. लोक माझे सांगाती मधील आपल्याच विधानाना फिरवत मुंडे यांनी उर्जा विषय प्रकल्पात खोडा घातला नाही तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्जाविषय धोरण पुढे चालविल्याचे म्हटले आहे.
शरद पवारांनी सरळ सरळ आपल्याच आत्मचरित्रातील भुमिकेला छेद दिला आहे.
घटना पाचवी
राज ठाकरे मुलाखत घेत असताना शरद पवारांनी आर्थिक निकषावर आरक्षण असावे अशी भुमिका घेतली. अगदी स्पष्टपणे त्यांनी आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचे समर्थन केले.
पण त्याआधी सत्तेत असताना आणि विरोधात असताना देखील मराठा आरक्षणासाठी आग्रही असल्याचे दिसत होते.
घटना सहावी
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण लोकांच्या लेकरांचे लाड का पुरवायचे असा प्रश्न विचारत सुजय विखे यांच्यासाठी अहमदनगरची जागा कॉंग्रेसला सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर कांहीच दिवसात आपला पक्ष सुजय विखे यांना उमेदवारी द्यायला तयार आहे. विखे यांनी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढवावी असे सांगितले आणि दुस-याच दिवशी कोलांटउडी घेतली.
एकाच उमेदवारीच्या बाबत शरद पवारांची ही भुमिका आश्चर्यकारक होती.
घटना सातवी
ही महत्वाची आहे. ही बाब आहे इव्हीएम ची इव्हीएम बाबत शंका घेऊ नये असे शरद पवारच आपल्या बोलण्यातून स्पष्ट सांगत होते. त्यानंतर बारामती मधला निकाल अनपेक्षीत लागला तर इव्हीएमवर शंका येईलच असे सांगितले.
आणि सगळ्यात कहर म्हणजे घड्याळाचे बटन दाबल्यावर मतदान मतदान कमळाला गेल्याचे मी डोळ्यांनी पाहिले असे विधान त्यांनी केले. ज्या भागात शरद पवारांचे मतदान आहे त्या भागत कमळ चिन्ह नाही आणि जिथे हा प्रयोग केला गेला तिथे घड्याळ हे चिन्ह नाही. जिथे घड्याळ आणि कमळ हे दोन्ही चिन्ह आहेत तिथे पवारांचे मतदानच नाही.
मग पवारांनी पाहिले कुठे आणि काय हा प्रश्न उरतोच. इव्हीएम बाबत तर पवारांची मते सतत बदलत आलेली आहेत.
मात्र मुलाखतकर्ते राज ठाकरे आणि त्यांचे बंधू सेनाप्रमुख उध्दव ठाकरे हे दोघेही आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी भूमिका नेहमीच मांडत आले आहेत. शरद पवारांनी त्या भूमिकेचे समर्थन तर केलेच नाही, उलट त्याची व ती भूमिका मांडणाऱ्या नेत्यांची खिल्ली उडवली. मराठा आरक्षणाच्या विषयाला सरकारमध्ये असताना गती दिली. विरोधी पक्षात आल्यावर त्याच्या आंदोलनाला बळ दिले. सरकारला धारेवर धरले.
आता राज ठाकरे यांच्यासमोर पवारांनी का भुमिका बदलली हेच समजायला मार्ग नाही.
अशा एक ना अनेक आश्चर्यजनक कोलांटउड्या शरद पवार यांनी घेतल्या आहेत. या लेखाच्या खाली त्याच्या लिंक दिल्या आहेत. त्यात सगळे सविस्तर वाचायला मिळेलच.
या लेखाचा हेतू या कोलांटउड्या सांगणे हा नाही तर शरद पवार यांना काय झाले आहे. हा प्रश्न पडतो आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना व्ही फॉर व्हीआयपी असे न समजता रोमन मधील पाच समजणारे पवार, निधी चौधरींचा उपहास न समजणारे शरद पवार आणि इव्हीएम बाबत सतत आपली भुमिका बदलणारे शरद पवार यांच्या विषयात व्ही म्हणजे वृध्दापकाळ आल्याचे लक्षण तर सांगत नाही ना! अशी शंका येऊन जाते.
एक ना अनेक आश्चर्यजनक कोलांटउड्या शरद पवार यांनी घेतल्या आहेत. या लेखाच्या खाली त्याच्या लिंक दिल्या आहेत. त्यात सगळे सविस्तर वाचायला मिळेलच.
या लेखाचा हेतू या कोलांटउड्या सांगणे हा नाही तर शरद पवार यांना काय झाले आहे. हा प्रश्न पडतो आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना व्ही फॉर व्हीआयपी असे न समजता रोमन मधील पाच समजणारे पवार, निधी चौधरींचा उपहास न समजणारे शरद पवार आणि इव्हीएम बाबत सतत आपली भुमिका बदलणारे शरद पवार यांच्या विषयात व्ही म्हणजे वृध्दापकाळ आल्याचे लक्षण तर सांगत नाही ना! अशी शंका येऊन जाते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.