शर्जील इमाम कायद्याने केले काम तमाम!

1 min read

शर्जील इमाम कायद्याने केले काम तमाम!

दिल्ली दंग्यातील आरोपी विद्यार्थी नेता शर्जील इमाम याला पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

दिल्ली दंग्यातील आरोपी विद्यार्थी नेता शर्जील इमाम याला पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. हा तोच शर्जील इमाम आहे ज्याने इशान्य भारताचा मूख्य भूमीपासून वेगळा तुकडा पाडण्याचे भडक विधान केले होते, दिल्ली दंगे भडकविण्यास आपल्या भाषणांनी मोठे योगदान दिले होते. 13 डिसेंबर 2019 ला याने जामिया मिलिया मध्येही असेच भडक भाषण केले होते. हा तोच शर्जील आहे ज्याने रस्ता पूर्णत: बंद करण्याची कल्पना मांडली होती. आणि त्यातूनच पुढे 15 डिसेंबरला पहिल्यांदा शाहिनबाग रस्ता रोको सुरू झाले.