मृत्यूच्या दरबारातून तीला मिळाले पुन्हा जीवनदान

1 min read

मृत्यूच्या दरबारातून तीला मिळाले पुन्हा जीवनदान

विषेश म्हणजे तीच्या अंतविधीची तयारी सुरू होती, परंतु दहा तासानंतर ती अचानक जीवंत झाली.

मृत्यूनंतरही कुणी जीवंत झाले, हे ऐकायला जरी अशक्य वाटत असले परंतु हे सत्य आहे. कारण युक्रेनमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. एका महिलेला या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले होते. विषेश म्हणजे तीच्या अंतविधीची तयारी सुरू होती, परंतु दहा तासानंतर ती अचानक जीवंत झाली. यानंतर त्या महिलेने सर्वांना आश्चर्यचकीत करणारी घटना सांगितली, जे ऐकूण तीचे कुटुंबही संभ्रमीत झाले.
स्टिरजावका शहरात वास्तव्यास असणारया या महिलेचे नाव जीनिया दिदुख आहे. त्यांचे वय ८३ वर्ष आहे. त्या एक सेवानिवृत्त परिचारिका आहेत. मागील आठवड्यातच त्या कोमा मध्ये गेल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी घरीच डॅक्टरांना बोलावले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॅक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार पद्धती सुरू ठेवण्यात आली होती.
परंतु डॅक्टर निघून गेल्यानंतर काही वेळातच अचानक त्यांची श्वसन प्रक्रिया बंद पडली. डॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आणि त्यांचे मृत्यू प्रमाणपञ बनवून कुटुंबियांना दिले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. दफनविधी सुरू असतानाच अचानक त्यांच्या मुलीला काहीतरी जाणवले. त्यांनी लगेच आपल्या आईच्या कपाळावर हात ठेवला तेच त्यांना धक्का बसला की, आपली आईतर जीवंत आहे. त्यानंतर त्यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले. तीथे गेल्यावर समजले की त्या कोमात होत्या आणि शेवटच्या स्टेजवर जावून पोहोचल्या होत्या. याचा अर्थ असा की मनुष्य जीवंत असूनही मृत असल्यासारखाच वाटतो. त्यांचा श्वासही बंद असल्याचे जाणवते. रूग्णालयात त्यांना एका आठवड्यापर्यत ठेवण्यात आले त्यानंतर त्या शुद्धीवर आल्या.
त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॅक्टर व्लादीमीर चेबोतारेव यांनी सांगितले की, त्यांच्या ३७ वर्षाच्या कारर्किदीत असा प्रकार बघायला मिळाला नाही. हे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. शुद्धीवर आल्यावर जीनिया यांनी सर्वांना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, जेव्हा मी कोमात होते, तेव्हा मी स्वर्ग पाहिला होता. मी माझ्या वडिलांना आवाजही दिला. मला जणू असे जाणवत होते की माझे वडील माझ्या जवळपासच आहेत आणि ते मला भेटायला नक्की येतील. जेव्हा त्या शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांना सर्व लोक पांढरया वस्ञामध्ये दिसले ते बघून त्यांना वाटले की ते जणू फरिश्तेच आहे परंतु नंतर कळले की ते डॅक्टर आहेत. त्यांना पुन्हा नवीन जीनवदान मिळाल्याबद्दल त्यांनी देवाचे आभार व्यक्त केले.