पुलावरून 'ती' घेत होती उडी,तेवढ्यात..

नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर विवाहितेने घेतला होता टोकाचा निर्णय, नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण...

पुलावरून 'ती' घेत होती उडी,तेवढ्यात..

सुमित दंडुके/औरंगाबाद : रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी उड्डाणपुलावर चढलेल्या विवाहितेला नागरीक व क्रांतिचौक पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी वेळीच अडविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास सेव्हनहील उड्डाणपुलावर घडली.

घटना अशी की, परभणीतील मजूर कुटुंब कामाच्या शोधात औरंगाबादला आले. ते झाल्टा फाटा येथील झोपडपट्टीत राहतात. गुरुवारी दुपारी ही विवाहिता तिचा पती व मुलगा सेव्हनहील परिसरात होते. तेव्हा विवाहितेचे तिच्या पतीसोबत जोरदार भांडणं झाली. रागाच्या भरात ही विवाहीता अतिथी होटेलच्या बाजूने उड्डाणपुलावर चढली आणि कठड्यावरून उडी घेणार तोच सतर्क नागरीक आणि लस घेण्यासाठी जात असलेल्या पोलीसांनी गाडी थांबविली आणि तात्काळ धाव घेत तिला अडवलं.
त्यानंतर तीला खाली उतरवुन पोलिसांनी तिची व तिच्या पतीची समजूत काढली आणि पुन्हा अस टोकाच पाऊल उचलणार नाही अस वचन तिच्याकडून घेतल.
पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका विवाहितेचा जीव वाचल्याने परिसरातील नागरिकांनी यांच कौतुक केल.

लस घेण्यासाठी निघाले होते पोलीस
क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, जमादार मंगेश पवार, पोलीस नाईक नरेंद्र गुजर, जावेद पठाण, संतोष रेड्डी, कृष्णा चौधरी हे लस घेण्यासाठी जात असताना त्यांनी हा प्रकार पाहुन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे त्यांचे ही कौतुक सर्व स्तरातून होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.