शेळीच्या चुकीमुळे मालकाला भरावा लागला दंड

1 min read

शेळीच्या चुकीमुळे मालकाला भरावा लागला दंड

शेळ्यांवर एका स्वयंसेवी संस्थेची झाडे चरण्याचा आरोप होता.

तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातील हुजूरबाद शहरात मंगळवारी दोन शेळ्यांना अटक करण्याचा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही शेळ्यांवर एका स्वयंसेवी संस्थेची झाडे चरण्याचा आरोप होता. स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन्ही शेळ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिस निरीक्षकाने सांगितले की, या दोन शेळ्यांना सोडण्यात आल्यावर त्यांच्या मालकाने एक हजार रूपयांचा दंड भरला. भारतीय दंड संहितेमध्ये प्राण्यांच्या अटकेची किंवा शिक्षेची कोणतीही तरतूद नसल्यामुळे या शेळ्यांना अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मालकाने दंड भरल्याशिवाय पोलिसांनी दोन्ही शेळ्यांना सोडले नाही. त्याच वेळी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेली रोपे पुन्हा शेळ्यांना चरण्यास न देण्याच्या सूचना देखील मालकाला दिल्या.