गावगुंडांकडून मेंढपाळांना मारहाण, महिलेची काढली छेड

मारहाण करणाऱ्या तरुणांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण अजूनही मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक झालेली नाही

गावगुंडांकडून मेंढपाळांना मारहाण, महिलेची काढली छेड

औरंगाबाद : जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील खिर्डी गावातील मेंढपाळांना ही मारहाण झाली. गोदावरी नदीच्या परिसरात मेंढपाळ मेंढ्या चारत असतांना त्यावेळी तिथे जवळपास १० ते १५ गावगुंड हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. त्यांनी थेट मेंढपाळांवर हल्ला चढविला.

मेंढपाळांनी सांगितले..
३० जून रोजी आम्ही गोदावरी नदीच्या काठावरील गंगापूर तालुक्यात सावखेडा शिवारातील नदीच्या काठावर शासनाने संपादित केलेल्या शेतात कुटुंबासह इतर सहकार्‍यांसोबत मेंढ्या चारत असताना दुपारी तीनच्या वेळी तीस ते पस्तीस मुले हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले व माझ्या सहकाऱ्यांना आणि पत्नीला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझी पत्नी भांडण सोडवायला आली असता तिचा ब्लाउज फाडून तिच्याशी छेडछाड केली, असा आरोप भाऊसाहेब खरात (वय.४०) यांनी केला आहे.

औरंगाबाद पोलिस महानिरीक्षकांना मेंढपाळांचं पत्र
आम्ही बाहेरील असल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांना हाताशी धरून आरोपींना साथ दिलेली आहे. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींशी हातमिळवणी करून गुन्ह्याचे स्वरूप कमी केलेलं आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणं गरजेचं होतं, परंतु तीही जप्त केली नाहीत. तक्रार घेताना फक्त पाच आरोपींची नाव घेऊन इतर आरोपींची नावे जाणून-बुजून घेतली जात नाहीयत. माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय द्या, असं पत्र फिर्यादींनी औरंगाबादचे पोलीस महानिरीक्षक यांना लिहिलेलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.