उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा,महावितरणने बिलापोटी विज तर ग्रामपंचायतने करा पोटी पाणी केले बंद

निटूरात ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा,पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ महामार्गावर पाणी मारण्यासाठी आलेल्या टँकरचे पाणी भरत आहेत.

उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा,महावितरणने बिलापोटी विज तर ग्रामपंचायतने करा पोटी पाणी केले बंद

विजय देशमुख/निलंगा: तालुक्यातील निटूर मध्ये ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी शिमगा करावा लागत आहे.  महावितरणने उन्हाळ्यात मार्च अखेर वसुलीचे कारण सांगून गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरचे कनेक्शन तोडले आहे. ( Shimga for water in summer, MSEDCL has cut off electricity while Gram Panchayat has cut off water supply )तर ग्रा.पं. ने सक्तीची वसुली सुरू केली असून जोपर्यत वसूली होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणार नसल्याचे सांगितले आहे.‌‌त्यामुळे भर उन्हाळ्यात निटूरकरांच्या नशिबी पाण्यासाठी शिमगा करावा लागत असून वरीष्ठांनी याकडे लक्ष देवून पाण्यासाठी होणारे हाल थांबवावेत अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे .

निलंगा तालूक्यातील सर्वात मोठी ग्रा.पं. म्हणून निटूरकडे पाहिले जाते.  या ग्रा.पं चे उत्पन्न ही चांगले आहे मात्र  भोंगळ कारभारामुळे ही ग्रापंचायत सतत चर्चेत असते.‌निटूर ग्रा.पं. कडे महावितरणची लाखो रूपये बाकी आहे. त्यामुळे महावितरणने गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या बोअर चे कनेक्शन तोडले आहे. मात्र जे पाणी पुरवठा करणारे व चालू असनारे बोअर आहेत. त्यांचे ग्रामपंचायतने काही बोअरचे  स्टार्टर काढून पाणी पुरवठा बंद केला आहे .

अगोदरच कोरोनाचा मार झेलणा-या ग्रामस्थावर महावितरणने अन् ग्रामपंचायतने मनमानी सुरू केल्याने ग्रामस्थामध्ये मोठा संताप पहायला मिळत आहे .‌‌निटूर मधील नागरीक महामार्गावर पाणी मारण्यासाठी आलेल्या टँकर चे पाणी भरत असून काही नागरीक पाणी विकत घेत असल्याचे सांगत आहेत.त्यामुळे  या संकटाकडे कोण पाहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.‌दरम्यान गेल्या आठ दिवसापासून निटूरमध्ये वसूलीच्या नावाने नागरीकांना वेठीस धरण्यात येत असून नागरीकांना कोरोना बरोबर कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे .निटूरात कोरोनाचा आकडा वाढला.‌‌सध्या निटूर गावामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.त्यामुळे जनता भयभित झाली आहे. गावातील करा पोटी ग्रा.पं.ने सक्तीने बंद केलेला पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा जेणेकरून नागरीकांना त्रास होणार नाही,दोन दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर ग्रा.पं. समोर हटके आंदोलन करून पाणी पुरवठा सुरळीत करायला भाग पाडू असा इशारा अनिल पाटील यांनी दिला.गेल्या वर्षभरापासून निटूरकर अनेक अडचणी ना सामोरे जात आहेत. कोरोना सारखा आजार असो की सध्याची पाणी टंचाई असो निटूरचे पं स.सदस्य कालिदास पाटील  हे  कुठेही दिसत नाहीत की गावच्या समस्येकडे पाहत नाहीत. गेल्या चार वर्षापासून आणि कोरोना काळातही काही ठोस कार्य दिसत नसल्यामुळे निटूरकरामध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.