"गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक घडवणार"-भगवान पायघन

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम...

"गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक घडवणार"-भगवान पायघन

सोनपेठ :तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान पायघन यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ऊर्जाचे स्फुरण चढवले.यावेळी भविष्यात सोनपेठ तालुक्यातील शिवसेनेला निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करून प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी त्यांचा भाऊ,त्यांच्या परिवारातील सदस्य म्हणून उभा राहणार असल्याचे पायघन यांनी सांगितले.

खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक निर्माण करणार असून प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या दुःखात आणि सुखात सोबत राहणार असल्याचेही कळवले.यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य भगवा ध्वज फडकवण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे,तालुका समनव्यक रंगनाथ रोडे,तालुकाप्रमुख भगवान पायघन,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,रावसाहेब पांडुळे,उपशहरप्रमुख रामेश्वर सोलापूरकर,युवासेना उपतालुकप्रमुख संतोष गवळी,शहरप्रमुख अमोल दहिवाळ,उपतालुकप्रमुख कुमार चव्हाण,सर्कल प्रमुख दिगंबर चौधरी,आनंद गुजराथी,युवासेना उपतालुकप्रमुख बाबू शेख,उपशहरप्रमुख गणेश जोशी,श्रीराम मुंडे,भास्कर भोसले,शाखा प्रमुख विशाल भोरे,खाजा कुरेशी,पत्रकार सुधीर बिंदू,वितरक रामेश्वर पोटे आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.