'तर शिवसैनिकांना गोळ्या घालीन' असे वक्तव्य करणाऱ्या नेत्याचा शस्त्र परवाना रद्द करा, शिवसैनिकांची मागणी

जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य लिंबंन महाराज रेशमे यांचा शस्त्र परवाना रद्द करून कार्यवाही करावी...

'तर शिवसैनिकांना गोळ्या घालीन' असे वक्तव्य करणाऱ्या नेत्याचा शस्त्र परवाना रद्द करा, शिवसैनिकांची मागणी

निलंगा : शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी लातूर जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य लिंबंन महाराज रेशमे बोलताना म्हणाले, कोणत्याही शिवसैनिकांनी वर्गणी अथवा देणगी मागितल्यास त्यांना गोळ्या घालणार म्हणून व्यासपिठावरुनच शिवसैनिकाला दम भरला यामुळे शिवसैनिकातून रेशमे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा येथील विश्रामगृहावर आयोजित शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीमध्ये बोलताना शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा लातूर जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य लिंबंन महाराज रेशमे बोलताना म्हणाले कोणत्याही शिवसैनिकांना कसलीही वर्गणी अथवा देणगी घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केलेले आढळून आल्यास ते सहन केले जाणार नाही. "हे थांबले नाही तर आशा शिवसैनिकांना गोळ्या घालीन" असा दमच व्यासपीठावरून सार्वजनिक ठिकाणी बोलताना दिल्याने शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण होऊन त्यांच्या या वक्तव्याचा शिवसैनिकातुन जाहीर निषेध केला जात असून रेशमे यांनी शिवसैनिकाची जाहीर माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे.

महाराज रेशमे यांच्या या वक्तव्याच्या निषेध नोंदवण्यासाठी जुन्या व नव्या शिवसैनिकाचे एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल होऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे तक्रार करणार असल्याचे समजते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडून शिवसैनिकाला गोळ्या घालण्याची भाषा म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार असल्याचे शिवसैनिक आतून बोलले जात आहे तर निलंगा तालुका शिवसेनेची संपूर्ण बागडोर त्यांचाच मुलगा शिवसेनेचा तालुका प्रमुख अविनाश रेशमे व लातूर जिल्हा नियोजन समितीचे शिवसेनेचे सदस्य लिंबंन रेशमे महाराज यांच्याच हातात असल्याने शिवसैनिकांवर दबावतंत्राचा अवलंब करण्यासाठी ज्या शिवसैनिकाच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आहेत त्यांच्याविषयी सार्वजनिक ठिकाणी धमकी देऊन त्यांना व पक्षाला अवमानित करण्याची भाषा योग्य नसून या घटनाबाह्य वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध नोंदवला असून पक्षाने याची दखल घ्यावी अशी मागणी शिवसैनिक पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी असे शिवसैनिकातुन बोलले जात आहे.

**माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील यांचा शस्त्र परवाना रद्द करून कारवाईची मागणी
**

शिवसेनेच्या शिफारसीने लातूर जिल्हा नियोजन कमिटीवर सदस्य म्हणून गेलेले लिंबंनमहाराज रेश्मे यांनी निलंगा येथील जाहीर कार्यक्रमातून वर्गणी अथवा खंडणी मागणाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या रेशमे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांच्याकडे असणारा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा त्यांच्या कडून शिवसैनिकाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे अशा आशयाचे तहसीलदार निलंगा यांना निवेदन देऊन तक्रार नोंदवली आहे एवढ्यावरच न थांबता एका शिष्टमंडळाच्या द्वारे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यांची तक्रार करणार असल्याचे यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील यांनी यावेळी सांगितले यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.