राणेंची किंमतच काय ? शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील - अशोक चव्हाण

1 min read

राणेंची किंमतच काय ? शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील - अशोक चव्हाण

राणेँबद्दल मला काही बोलायचे नाही, त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या.

सुमित दंडुके / औरंगाबाद.दि.२७ : राणेँबद्दल मला काही बोलायचे नाही, त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय ? विषय शिवसेनेचा आहे, त्यामुळे योग्यवेळी शिवसैनिकच त्यांना उत्तर देतील. अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सोमवारी चव्हाण यांनी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव अंतीम टप्य्यात असून, दोन आठवड्यात तो मंत्रीमंडळासमोर येईल. कोरोनामुळे रस्ते कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता. आता मराठवाड्यासह राज्यातील रस्त्यांच्या कामांना गती मिळेल. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. असेही चव्हाणांनी यावेळी सांगितले.