सरनाईकांच्या पाठिशी शिवसेना खंबीर- संजय राऊत

प्रताप सनाईक हे शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्त्वाचे सदस्य...

सरनाईकांच्या पाठिशी शिवसेना खंबीर- संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे आ. प्रताप सरनारईक यांच्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकणावर भाष्य केलं आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष त्यांच्या पाठी कायम उभा राहील.असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, सरनाईक त्रासात आहेत अडचणीत आहेत. त्यांचं कुटुंब अडचणीत आहे. त्याचं कारण पत्रात दिलं आहे. भाजप विनाकारण त्रास देत आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं, असं ते म्हणतात. ते त्यांचं मत आहे. पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे घेत असतात. त्यांचा विनाकारण त्रासातून मुक्तता कशी करायची हे आम्ही पाहू, असं सांगतानाच संपूर्ण शिवसेना सरनाईक यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभी आहे, असंही खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केल आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.