आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा शिवसेनेचा निर्धार

शिवसेनेच्या औरंगाबादमधील स्थापनेच्या 36 व्या विर्धापन दिनानिमित्त व्हर्च्युअल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा शिवसेनेचा निर्धार

औरंगाबादः यापुढील काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीसह सर्व निवडणुका स्वबळावर लढवुन पुढे जाण्याचा निर्धार मंगळवारी शिवसेनेच्या औरंगाबादमधील स्थापनेच्या ३६व्या वर्धापनदिनी आयोजीत ऑनलाईन मेळाव्यात करण्यात आला.

शहरासाठी १६८०कोटींच्या पाणिपुरवठा योजनेचे काम सुरु झाले आहे. शहरातील रस्त्यांची कामे होत आहेत. सफारी पार्क होत आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. शेतक-यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात येणा-या सर्व निवडणुकांत शिवसेना पुढे जाईल. आता आपल्या हातुन कोणतीही चुक होता कामा नये, शिवसेना ही चार अक्षरे जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. काही शिवसैनिक आपल्यात नाहीत. त्यांच्या बलिदानामुळे शिवसेना ही चार अक्षरे आज सर्वत्र कोरली गेली आहेत. अशी भावना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, यापुढे येणा-या जिल्ही परिषद, महापालिका, पंचायत समित्यांसह सर्व निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढल्या पाहिजे, असा संकल्प वर्धापन दिनी करुया. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ६० टक्के जागा आहेत. जिल्हा बँकही ताब्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना नक्कीच पुढे जाईल.  

दरम्यान या व्हर्चुअल मेळाव्यात रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आ. मनिषा कायंदे यांच्यासह आ. प्रदिप जैस्वाल, आ. आंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे आदी सर्व पदाधीकारी आणि शिवसेनिकांनी सहभाग नोंदवला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.