सोनपेठमध्ये  पीककर्जासाठी शिवसेनेचा पुढाकार!

1 min read

सोनपेठमध्ये पीककर्जासाठी शिवसेनेचा पुढाकार!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शहरप्रमुख कृष्णा पिंगळे यांचा पीककर्जासाठी पुढाकार

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ तालुक्यात असणाऱ्या एकाच राष्ट्रीयकृत बँकेचा ताण आणि यातून शेतकऱ्यांसाठी पीककर्ज म्हणजे नुसत्या चक्करा ही प्रतीमा मोडीत काढण्यास शाखाधिकारी राजेश राहाटे यांना यश आले असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यावर्षी प्रथमच कर्जमाफीची प्रक्रिया आणि याला आलेला वेग त्यातच शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट यावर एकमेव असणारी राष्ट्रीयकृत बँक यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यापासून वंचीत राहण्याचा प्रकार समोर येत असतानाच शाखाधिकारी राजेश राहाटे यांनी तोडगा काढत सोशल डिस्टन्स ठेवून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य सभागृहात या शेतकऱ्यांसाठी पीककर्ज स्वाक्षरी कार्यशाळाच आयोजित करत बँकेचा कार्यभार हाताळत आपले दायित्व राखले आहे.
यासोबतच शिवसेनेचे शहरप्रमुख कृष्णा पिंगळे यांनीही शेतकरी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून शेतकऱ्यांना करावी लागणारी येरझार थांबवली आहे. यामुळे वेळेसोबतच खर्चाचा अपव्यव वाचून शेतकऱ्यांना मदत झाली असल्याचे कळते.तालुक्यात ३७०० पीककर्ज लाभार्थी शेतकरी पात्र आहेत. यातील २७०० शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ मिळाला असून १८०० शेतकऱ्यांशी शहरप्रमुख कृष्णा पिंगळे यांनी समनव्य ठेवत त्यांची कामे मार्गी लावली आहेत.एकंदर शहरप्रमुख पिंगळे आणि शाखाधिकारी राजेश राहाटे यांच्या कार्याबद्दल शेतकरी कौतुक व्यक्त करत आहेत.

शहरप्रमुख कृष्णा पिंगळे 

त्याचबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी बँकेच्या पिककर्जासाठी वेगवेगळ्या बँकाकडून बेबाकी प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत होती.ही मागणी यावर्षी पहिल्यांदाच शिवसेनेचे शहरप्रमुख कृष्णा पिंगळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांकडून बेबाकी घेऊ नये याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.शहरप्रमुख पिंगळे यांच्या मागणीची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन यासाठी संबधित बँकांना सूचना देण्यात आल्यामुळे तालुक्यातील वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून पस्तीस हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे तब्बल तीन कोटी पन्नास लक्ष रुपयांची बचत शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे झाली आहे.त्याबद्दलही शहरप्रमुख कृष्णा पिंगळे यांचे शेतकऱ्यांमधून आभार व्यक्त होत आहेत.