महागाई विरोधात शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा

मोर्चाचे नेतृत्व शिवसेना खा. संजय राऊत करणार आहेत.

महागाई विरोधात शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा

औरंगाबाद- पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या किमती वाढत असल्याने सामान्यांच्या खिशाला झळा पोहचत आहे.यासह इतर वाढलेल्या दरांविरोधात हा जनआक्रोश मोर्चा शनिवारी काढण्यात येणार आहे.या मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय राऊत करणार आहेत.क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत या मोर्चाचा मार्ग असणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी सरकारने २०१४ साली महागाईविषयी केलेल्या घोषणा हवेतच केले असल्याचे सांगितले या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.सर्वचं क्षेत्रात दरवाढ झाली असुन २०१४ पुर्वीचे दर आणि आताचे दर या दोन्ही दरांचे तुलनात्मक फलक लावून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे.तसेच दि.११ नोव्हेंबर रोजी महिला आघाडीकडून शहरात विविध ठिकाणी निवेदने करण्यात येणार आहे.तर शनिवारी दि.१३ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

या मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मनिषा कायंदे, आमदार प्रदिप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, नंदकुमार घोडेले यांचीही प्रमुख उपस्थिती राहील. मोर्चाची सुरुवात क्रांती चौक येथुन होऊन गुलमंडी येथे सभेने समारोप होईल. त्याआधी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जि.प, पंचीयत समिती गट गणनिहाय महागाई विरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.