जळगावात शिवसेनेचा भाजपला धक्का

पालिकेवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला

जळगावात शिवसेनेचा भाजपला धक्का

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना २८ मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली आहे. आज ऑनलाईन पद्धतीने महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली.

जळगाव महानगर पालिकेवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे २७ तर एमआयएम पक्षाचे ३ नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला ४५ तर भाजपला ३० मते मिळाली.

महापालिका पक्षनिहाय संख्याबळ
भाजप ५७
शिवसेना १५
एमआयएम ३
स्विकृत सदस्य ५
एकुण ८०


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.