शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे कार्यकारी संपादकही आहेत. अभिनेत्री कंगना रनौत ने मुंबईची तुलना पाकिस्तानच्या काश्मीर (पीओके) शी केली तेव्हा संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली.
शिवसेनेने मंगळवारी दिलेल्या निवेदनात,संजय राऊत यांना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आहे. शिवसेनेने राऊत यांच्याशिवाय खा.अरविंद सावंत आणि खा.धैर्यशील माने यांच्याशिवाय नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, महाराष्ट्रातील मंत्री उदय सामंत, अनिल परब, गुलाबराव पाटील, आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि ज्येष्ठ नेत्या नीलम गो-हे यांचीही पक्षाच्या प्रवक्ते म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचा ‘आवाज’ संजय राऊतच
पक्षाने दिली महत्वाची जबाबदारी.खासदार संजय राऊत यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...