सर्टीफाईड गुंडे

राम हा आमच्या श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी रामाला, रामाच्या चरित्रावर, रामाच्या चारित्र्यावर आघात करत, सातत्याने हिंदुला डिवचण्याचं काम करतो आहे आणि या डिवचण्याला खतपाणी घालण्याचं काम आपण सामनामधुन केलं आहे.

सर्टीफाईड गुंडे

महाराष्ट्रः मनातलं कधी दाबुन ठेवता येत नाही, जितकं ते आपण दाबुन ठेवतो ते पटकन बाहेर पडतं. एका व्हिडिओमध्ये संजय राऊत स्वतः सांगितलं की, होय, आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत. शिवसेना सर्टीफाईड गुंड आहे, याची कबुली विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्टपणे दिली आहे. राऊतांना आपण गुंड आहोत असं म्हणुन शिवसेनेची वाट लावायची आहे, की भाजपला धमकी द्यायची आहे, की ते गुंड आहेत असं कोणाच्या ईशा-यावर सांगत आहेत? यासारखे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेली पडले असतील.

शिवसेना सर्टीफाईड गुंड आहे, असं संजय राऊत म्हणाले आणि त्याआधी शिवसैनिक मुंबईच्या रस्त्यांवर गुंडगिरीचं कृत्य करतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रस्त्यावर ठोकलं, यात पराक्रम आहे असं शिवसैनिकांनी सांगितलं. मुळात भाजपचे कार्यकर्ते तिथे आले, कारण राममंदिर न्यासाच्या निर्माण कार्याविषयी सामनामधुन याच विश्वप्रवक्त्यांनी जोरदार टिका केली होती. राममंदिराच्या कारभारावर जोरदार टिका केल्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते तीथे आंदोलन करण्यासाठी गेले. मग राऊतांना हा प्रश्न पडला की 'आम्ही राम मंदिरावर टिका केली मग तुम्हाला मधे यायचं काय कारण.' संजय राऊत अगदी ठामपणाने सांगत आहेत की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या श्रद्धास्थानावर म्हणजेच शिवसेना भवनावर मोर्चा काढुन येणं हे शिवसैनिक कधीही सहन करणार ऩाहित, शिवसेनेला ते आवडणार नाही. राऊतांचा हा दावा खरा मानला तरी त्यांनी त्यांच्या सर्वाधिक चर्चील्या जाणा-या आणि सर्वात कमी खपणा-या सामनामधुन राममंदिर न्यासाच्या कामावर जी टिका केली आहे, ती टिका हिंदु म्हणुन, रामाचा भक्त म्हणुन त्याच्या श्रद्धास्थानावर टिका करणं राऊतांना शोभणारं आहे का?

त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे, आमच्या आस्थेच्या प्रतिकावर आपण ज्या स्वरुपाची टिका करत आहात, ती टिका कोणता हिंदु सहन करेल.  राममंदिर न्यास आणि राममंदिर निर्मीती हि केवळ एक संस्था, पक्ष, राजकीय कारण अशा स्वरुपात नाही. वर्षानुवर्षापासुन राममंदिरासाठी अनेकांनी लढा दिला आहे, त्या लढ्याला यश मिळालं आणि मागच्या वर्षी मंदिर निर्मीतीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राममंदिराची निर्मीती सुरु झाली आणि अनेकांना पोटसुळ उठला. सुरुवातीच्या काळात जेव्हा भाजपच्या बाजुने तुम्ही होतात तेव्हा राममंदिर निर्मीती हा शिवसेनेच्या अभिमानाचा विषय होता. एक कोटीची देणगीही आपण दिली होती. राममंदिराआधी वादग्रस्त वास्तु पाडण्यात शिवसैनिकांचा हात आहे असं बाळासाहेब ठाकरे मोठ्या अभिमानाने म्हणाले होते.

आता तुमची तिकडची बैठक उठली आहे आणि ईकडची चालु झाली आहे. म्हणजे मीर बाकी आणि बाबराच्या आक्रमण कार्यांना समर्थन करणा-यांच्या रांगेत आपण जाऊन उभे राहिला आहात. आता मात्र राममंदिर हा आपल्या आस्थेचा विषय राहिला नाही. पुर्वी हेच राममंदिर आपल्या आस्थेचा विषय होता. बाबरीच्या पतनानंतर ती आम्हीच पाडली असं आपण सांगत होतात, कारण त्याचा फायदा निवडणुकांमध्ये आपल्याला होणार होतात. 1993 मध्ये बाबरी पडली 1995 ला निवडणुका झाल्या, 1995-99 याच मुद्द्यावर महाराष्ट्रातली सत्ता आपण उपभोगली. पुढे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेवर आली, ती सत्ता देखिल आपण उपभोगली.

आता 2021 मध्ये यावर टिका केली पाहिजे याची जाणिव शिवसेनेला होत आहे. तुमच्या श्रद्धास्थानावर भाजपने मोर्चा काढल्याचा जितका राग तुम्हाला आला, तितकाच राग देशातल्या हिंदुंना राममंदिर न्यासावर टिका केल्याने येणं स्वाभाविक आहे. राममंदिरासाठी जेव्हा आपण एक कोटी रुपये दान केले तेव्हा हे कार्य दिव्य आहे असे आपल्याला वाटत होते. राम हा आमच्या श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी रामाला, रामाच्या चरित्रावर, रामाच्या चारित्र्यावर आघात करत, सातत्याने हिंदुला डिवचण्याचं काम करतो आहे आणि या डिवचण्याला खतपाणी घालण्याचं काम आपण सामनामधुन केलं आहे.

मुळात जो व्यवहारच चेकने झाला आहे, न्यासाने अधिकृतरीत्या अठरा लाख पन्नास हजार रुपयांचा चेक त्या खरेदिदाराला दिला आहे. न्यासाने हा व्यवहार बाजारभावापेक्षा कमी रकमेत केल्याचं सिद्ध केलं आहे. या व्यवहारापुर्वीच्या व्यवहाराच्या प्रती देखिल सिद्ध केल्या आहेत, तो किती वेळा रद्द झाला हे सांगितलं आहे. जमिनीचा भाव निकाल लागण्याआधिचा होता हे देखिल सिद्ध केलं आहे. यातलं वास्तव समोर आल्यावरसुद्धा तुम्हाला खाजवून खरुज आणण्याची ईतकी विचित्र सवय आहे, की तुम्ही एक संधी मिळाली म्हणुन सामनामध्ये लिहुन टाकलं. हिंदुंच्या आस्थेवर घाला घातल्यानंतर तुमच्याकडे कोणी जाब मागयला आलं, तर त्यांना तुम्ही पोलिसांकडुन किंवा शिवसैनिकांकडुन मार खाऊ घालणार? अर्थात आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत हे सांगुन सिद्ध केलं. नुकतंच शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनी काँट्रॅक्टरला केलेली मारहाण, पंढरपुरमध्ये एका भाजपच्या कार्यकर्त्याने फेसबुकवरुन मुख्यमंत्र्यावर केलेल्या टिकेनंतर शिवसैनिकांनी त्याला ज्या पद्धतीने चोप दिला, तुमचा विदर्भातला आमदार एका महाराजाला ज्या पद्धतीने अश्लील शिवीगाळ करतो त्यावरुन तुम्ही सर्टीफाईड गुंड आहात हे वारंवार सिद्ध झालं आहे. 'आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत' हि भाषा गुंडागर्दीचीच आहे.

तुमच्या कार्यालयासमोर जमलेली गर्दी हिंदुंची होती, कदाचित त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, भाजपची गर्दी असं नाव दिलं असेल पण सामनामधुन आपण केलेल्या लिखाणाला प्रतिक्रीया म्हणुन हे लोक जमले होते. राऊतांचा भाजपवरचा राग, पवारांवरचं प्रेम, उद्धव ठाकरेंवरची निष्ठा, बाळासाहेबांवरची श्रद्धा आम्ही समजु शकतो. परंतु तुमच्या श्रद्धा जशा गृहित धरल्या पाहिजेत, तशाच राममंदिरासाठी असंख्य हिंदुंच्या असलेल्या श्रद्धाही गृहीत धरल्या पाहिजेत. ज्या चंपकरायांच संपुर्ण आयुष्य राममंदिरासाठी गेलं, आणिबाणीच्या काळात चंपतराय सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक असताना, ते इतके विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते की त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही अटक करावी की नाही, असा विचार करावा लागला होता. त्या चंपकरायांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन राममंदिरासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अशा व्यक्तिला कोणासाठी प्राॅपर्टी गोळा करायची आहे असा प्रश्न पडतो.

"आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत असं सांगुन आम्ही गुंडागर्दी करु, राममंदिराच्या बाबतीत तुमच्या भावना दुखावल्या तरीही तुम्ही व्यक्त व्हायचं नाही," हे तुम्ही सांगत आहात. याचा एकच अर्थ होतो की, राम मंदिरावरती, रामावरती, रामभक्तावरती तुम्ही कोणतीही कृती कराल, ती आम्ही शांतपणे सहन करायची. सातत्याने राम चरित्रावरती आघात करण्याचं काम लोक करत आहेत. असे आघात हिंदु कधीपर्यंत सहन करणार हा महत्वाचा प्रश्न आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.