शिवसेनेकडून राममंदिरासाठी एक रुपयाही आला नाही, एक कोटी देणार होते- गोपालदास

1 min read

शिवसेनेकडून राममंदिरासाठी एक रुपयाही आला नाही, एक कोटी देणार होते- गोपालदास

शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती

स्वप्नील कुमावत: अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली होती. शिवसेनेकडून 1 कोटी मधील एक रुपयाही अजून आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिर निर्मितीसाठी जो ट्रस्ट स्थापन झाला आहे. त्याचे महंत नृत्य गोपाल दास अध्यक्ष आहेत. राममंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सारे साधुसंत तयारीत आहेत. आता लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल. एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व मान्यवरांना बोलविले जाणार आहे.

**अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी केली होती घोषणा **
उद्धव ठाकरे अयोध्या दौरावर आले होते तेव्हा , मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. तेव्हा शिवसेना ट्रस्टच्यावतीने १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्वीकार करावा, असेही ठाकरे म्हणाले होते.