सेना आमदाराची रिक्षाचालकाला मारहाण

आमदार अंबादास दानवेंच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल...

सेना आमदाराची रिक्षाचालकाला मारहाण

औरंगाबाद : जिल्ह्यात काल दुपारी ४ वाजेनंतर लॉकडाऊन लागेल अशी चर्चा असल्यामुळे नागरिकांनी घर गाठण्याची घाई सुरू केली. यामुळे सर्वच मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांच्या मदतीला रस्त्यावर उतरलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना काल दि.२८ रोजी दुपारी चारच्या सुमारास क्रांती चौकात घडली.
mla
आमदार अंबादास दानवे हे त्यांच्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. शिवसेनेतही चंद्रकांत खैरैंसोबतचे त्यांचे वाद चर्चेत असतात. काल दानवे क्रांती चौक पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यावर वाहतूक नियमन करत होते. यावेळी अचानक रिक्षाचालक (एमएच २० ईएफ ३२२५) नियम मोडत वेगाने जात होता. तेव्हा या रिक्षाचालकाला पाहून दानवेंचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या रिक्षाचालकाला थांबवून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

अंबादास दानवे म्हणाले,
रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. तेव्हा मी शिवसैनिकांसह वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. मी माझे पद विसरुन शिवसैनिक म्हणून पोलीसांच्या मदतीसाठी धावलो.

रिक्षाचालकाला मारहाण करण्याचा अधिकार दानवेंना कोणी दिला ?
आमदार दानवे हे शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरले तर शिवसैनिकांना मारहाण करण्याचा अधिकार आहे का?, जे काम कायद्याने करणे शक्य आहे त्यासाठी मारहाण करण्याची गरज काय?, हीच मारहाण जर ट्राफीक पोलीसांनी केली असती तर, किंवा दानवेंचे अनुसरण करुन उद्या सगळेच ट्राफीक पोलीस मारहाण करु लागले तर याचे काय परिणाम होतील.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.