शिवसेनेच्या 5 नगरसेवकांची घरवापसी,केला होता राष्ट्रवादीत प्रवेश

1 min read

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांची घरवापसी,केला होता राष्ट्रवादीत प्रवेश

पारनेरचे आमदार निलेश लंके देखील उपस्थितीत

मुंबई: पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर यांचे थेट पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेतली व आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप अजित पवारांना पाठवला.त्याच नगरसेवकांची पुन्हा शिवसेनेत घरवापसी झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी 5 नगरसेवकांची घरवापसी झाली. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके देखील उपस्थितीत होते.
ते 5 नगरसेवक कोण
नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी,डॉ.सय्यद,किसन गंधाडे अशी त्या नगरसेवकांची नावे आहेत.