धक्कादायक: औरंगाबादेत 90 वर्षीय वृद्ध महिलेला नातेवाईकांनी जंगलात सोडून दिले.

1 min read

धक्कादायक: औरंगाबादेत 90 वर्षीय वृद्ध महिलेला नातेवाईकांनी जंगलात सोडून दिले.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना

अभिलाष अपसिंगेकर/औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. काही बरे वाईट प्रकार आजूबाजूला घडत आहेत. काही दुःखद तर काही संतापजनक घटना घडत आहेत. अशीच माणुसकीच्या नावावर काळिमा फासणारी घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे. एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईकांनी जंगलात सोडून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.
औरंगाबाद मधील कच्चीघाटी परिसरात नातेवाईकांनी कोरोनाबधित आजीला जंगलात सोडून तिथून पसार झाले. तिथल्या स्थानिक लोकांना ही महिला सापडली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला कोरोना झाल्याचे समोर आले. तिची विचारपूस केल्यानंतर त्या महिलेला कोरोना झाल्याचे कुटुंबीयांना माहित पडले होते. या आजींना जंगलात सोडून जाणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.