धक्कादायक..! सातवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद...

धक्कादायक..! सातवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

सुमित दंडुके/औरंगाबाद : सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दि.०१ मार्च रोजी गारखेडा परिसरातील आनंदनगरात रात्री घडली. संजीवनी उर्फ दिपाली एकनाथ घेणे (वय.१४, रा.गारखेडा परीसर,आनंदनगर,गल्ली.नं.१६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याविषयी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दिपालीचे आई-वडील दोघेही चणे, फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे कालही तिचे आई-वडील आणि लहान भाऊ व्यवसायासाठी घराबाहेर पडले. रात्री नऊ वाजेला ते घरी आले. तेव्हा घराचा बाहेरील दरवाजा आतून बंद होता. त्यांनी आवाज दिले पण तिचा प्रतिसाद आला नाही. लहान भाऊ घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा दिपालीने साडीने लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला दिसले. घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड करत याबद्दल त्याने आई-वडीलांना सांगितले. शेजाऱ्यांनी याची माहिती तात्काळ पुंडलीकनगर पोलीसांना कळविली, पोलीसांनी दिपालीला फासावरुन उतरवून घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले.
suicide_case_dipalii
नेहमी हसत-खेळत असणाऱ्या दिपालीने एवढ्या कमी वयात आत्महत्येसाखे टोकाच पाऊल का उचलले य़ाचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.