धक्कादायक..! सख्ख्या भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

मुलीची प्रसुती झाल्यानंतर प्रकार आला उघडकीस...

धक्कादायक..! सख्ख्या भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

औरंगाबाद : नुकताच हिंदूंचा सण रक्षाबंधन साजरा करण्यात आला. बहिण-भावांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नूर कॉलनी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर ३३ वर्षीय सख्ख्या भावानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुर कॉलनीतील एका कुटुंबात राहणाऱ्या ३३ वर्षीय भावाने अल्पवयीन बहिणीला स्पर्श करीत विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. आणि घरात कोणाला सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. हा अत्याचार सतत सुरु होता. त्यानंतर काही महिन्यांनी या मुलीला गर्भधारणा झाली. सात महीने झाल्यानंतर पिडीतेने ही बाब भावाला सांगितली. तेव्हा भावाने हे बाळ माझे आहे, हे कोणाला सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी दिली. मुलीने आई-वडीलांना ही गोष्ट कळवली, तेव्हा तुझी प्रसुती होऊ दे नंतर तुझे लग्न लाऊ. असे सांगितले. त्यानंतर पिडीतेला प्रसुतीसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने एका मुलाला जन्म दिला. डॉक्टरांनी विचारणा केल्यानंतर मुलगी विधवा असल्याचा बनाव करण्यात आला. यानंतर संशय आल्याने डॉक्टरांनी मुलीचे आधारकार्ड मागितले. यावरुन मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा रुग्णालयाने १८ वर्षांखालील मुलीची प्रसुती झाल्याची माहिती एमएलसी सिटीचौक पोलीसांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली, पिडीतेला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर सख्ख्या भावानेच अत्याचार केल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलीसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला आणि अखेर रविवारी संध्याकाळी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र, पोलीसी खाक्या दाखविताच त्याने अत्याचार केल्याची कबूली दिली. सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.