धक्कादायक, लहान मुलांमध्ये देखील वाढतोय कोरोनाचा संसर्ग.

1 min read

धक्कादायक, लहान मुलांमध्ये देखील वाढतोय कोरोनाचा संसर्ग.

लक्षणे दिसत नसलेली मुले संसर्ग पसरविण्यासाठी मोठे कारण ठरू शकतात. त्यामुळे वेळीच सावधागिरी बाळगुन काळजी घेणे गरजेचे.

सुमित दंडुके: कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर लहान मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण खुप कमी होते. मात्र आता हे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे वैद्यकीय व संशोधन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 0 ते १० वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत ८० टक्यांनी वाढले आहे.
१५ ऑगस्ट रोजी राज्यातील लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण २३,००५ इतके नोंदविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या अहवालामध्ये आज 0 ते १० वयोगटामध्ये ४२,५१७ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
ज्या मुलांना इतर प्रकारच्या व्याधी आहेत. त्या मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग तीव्र आहे. तर इतर मुलांमध्ये लक्षणे सौम्य आहे. लक्षणे दिसत नसलेली मुले संसर्ग पसरविण्यासाठी मोठे कारण ठरू शकतात. त्यामुळे वेळीच सावधानी बाळगुन काळजी घेणे गरजेचे आहे.