शोरुमवाल्यांसारखी छोट्या गॅरेजवाल्यांची अवस्था

1 min read

शोरुमवाल्यांसारखी छोट्या गॅरेजवाल्यांची अवस्था

स्वप्नील कुमावत/औरंगाबादः कोरोना सारख्या आजारामुळे देशव्यापी लॉकडाउन करण्यात आले.  यामुळे नागरिकांचे  घरीच  होती. आता लॉकडाउन नंतर त्या वाहनांची प्लग, क्लच, ब्रेक, अँक्सिलेटर, पिस्टन, बॅटरीची कामे निघली आहेत. यामुळे छोट्या गॅरेजवर शोरुम सारखी गर्दी दिसत आहे. त्यामुळे गॅरेजवाल्यांची आवस्था शोरुमसारखी झाल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाउन तब्बल 75 दिवस चालला. याकाळात दुचाकीचा वापर थांबल्याने दुरुस्तीची कामे निघाली आहेत. यासाठी संभर रुपयांपासून ते साडेचार हजार रुपयांपर्यत खर्च येत आहे. यात समाधानाची बाब म्हणजे, लॉकडाउन नंतर पुन्हा गॅरेज व्यवसायाला चालना मिळाली आहे.

लॉकडाउन काळात अनेकांच्या दुचाकी घरी पार्किंगमध्ये उभ्या होत्या. त्यामुळे स्पार्क प्लग तसेच  क्लच, ब्रेक, अँक्सिलेटर केबल कठीन झाल्या आहेत. इतक्या दिवस पेट्रोल टाकीतच असल्याने तेही खराब झाल्याचे प्रकार दुरुस्तीवेळी पाहायला मिळत आहेत. अनेक गॅरेजची कामे लोकलच्या मेकॅनिक द्वारे  सुरु आहेत बाहेरगावचे   मेकानिक अजुन बोलवण्यात आले नाहीत.