एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळू नये? मलिकांचा गंभीर आरोप

एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळू नये? मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबी वर चौकशीचा बनाव रचल्याचा आरोप करत आहेत. २ ऑक्टोबरला मुंबईत क्रूझवर कारवाई केल्यानंतर नवाब मलिक यांनी हा सगळा एनसीबीनं केलेला बनाव असल्याचा आरोप केला. तसेच, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अटक करण्यात आलेल्या ८ जणांना देखील चुकीच्या पद्धतीने अटकेत ठेवल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज त्यांनी जावई समीर खान याच्या अटकेसंदर्भात एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १३ जानेवारी २०२१ रोजी समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.

“माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, संबंधि अधिकाऱ्याचा फोन नंबर देखील दाखवला.

कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलंय की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये आलं आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवलं. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवलं. रिया चक्रवर्ती प्रकरणातल्या एका आरोपीला या प्रकरणात टाकलं”, असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.