श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारिणी जाहीर

1 min read

श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारिणी जाहीर

राजेंद्र हलवाई यांची जिल्हाअध्यक्षपदी निवड

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: जिल्हा श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नूतन कार्यकारिणी संघटनेच्या रविवार दिनांक 19 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये निवडण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र हलवाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर कार्यकारिणीतील कार्याध्यक्षपदी संदीप पाचमासे, उपाध्यक्षपदी वसमतचे प्रदीप पातेकर, आखाडा बाळापूर येथील संजय चांदीवाले तर जवळा बाजार येथील प्रमोद पांडे यांची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त सचिवपदी हरीश कीर्तीवार, सहसचिव म्हणून अमित कंठे, कोषाध्यक्षपदी शेख शकील शेख बशीर, प्रसिद्धीप्रमुख म्हणून काशिनाथ कदम तर कार्यकारिणी सदस्य म्हणून विनोद जोशी, माणिक पंडित, सल्लागार समिती सदस्य म्हणून प्रद्युम्न गिरीकर यांची निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध अडचणी सोडविण्यास संदर्भात अग्रेसर राहून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र हलवाई यांनी व्यक्त केली.
या बैठकीला ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते एकनाथ पाच मासे यांच्यासह सुभाष अपूर्वा, गजानन तळवलकर, रमेश वाबळे, कपिल सावळे, अनिल उघडे गजानन पाटोळे, दिनकर धबडगे, यासह सहा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेले वृत्तपत्र विक्रेते सदस्य उपस्थित होते.