श्रेयाचे राजकारण आणि भावनेचा ओलावा

1 min read

श्रेयाचे राजकारण आणि भावनेचा ओलावा

सगळ्याच गोष्टीत राजकारण नसते. म्हणूनच आपल्या लोकांसाठी राजकीय भुमिका बाजुला ठेवत पंकजा मुंडे यांनी सरकारसोबत चर्चा केली. प्रसंगी पक्षविरोधाचे खोटे आरोप स्विकारले. यश मिळाल्यावर नम्रपणे श्रेय घ्यायला नकार दिला. तरीही उसतोड मजुरांच्या घरवापरसी वरून श्रेयाचे राजकारण झालेच

हे सगे सोयरे माझे
वासरे गुरे गोपाळ
उद्दाम उधळते अश्व
ते तुझे तुच सांभाळ

कांही आपल्या मिळवलेल्या ऐश्वर्याचा अधिकाराचा फारच अभिमान असतो. पण लाखो मनावरचे अधिराज्य महत्वाचे असते. या मनामनाच्या संपर्कात भावनेचा ओलावा असतो. आणि हा ओलावा असेल तर कधीच एखाद्यासाठी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची अथवा ते मीच कसे केले हे सांगण्याची गरज नसते.

असाच काहिसा प्रकार मागच्या कांही दिवसात घडला आहे. उसतोड करणारा वर्ग बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. इतका मोठा की, संपूर्ण महाराष्ट्रातील साखरउद्योग बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारावर अवलंबून आहे. जरा स्पष्टच सांगायचे तर बीड जिल्हाच ठरवतो की कारखाण्याचे चाके फिरू द्यायची की नाही ते.. हे अभिमानास्पद नसेल पण वास्तव आहे.

कोरोनाच्या संक्रमणास सुरूवात झाली आणि सगळं जग लॉक डाऊन झाले. अगदी देशातील उद्योग देखील बंद झाले. सगळं जग स्तब्ध झाले तरी साखर कारखाण्याचे बॉयलर मात्र पेटलेले होते. आणि महामारीत अपरीहार्यपणे उसतोड कामगार आपल्या घराबाहेर पडून कामाला लागला होता. हे धोकादायक होते.

किती धोकादायक हे आपल्याला आकडेच सांगतील. जवळपास ३८ साखर कारखाण्याचा हंगाम चालू होता. आणि त्यात १ लाख ३२ हजार इतका उसतोड कामगार एकट्या राज्यात बाहेर होता. आणि हे सगळे आपल्या टोळीच्या सोबत बाहेर होते. त्यांनी घेतलेली उचल त्यांना हे करायला भाग पाडत होती. व्यवहार असतो तो.
pakaja-munde
एवढा मोठा वर्ग महामारीत काम करतोय. लॉकडाऊन मध्ये काम करत असताना त्यांची सोय कशी होईल? ते सुरक्षीत राहतील का? असे अनेक प्रश्न होतेच. म्हणूनच अगदी सुरूवातीला पंकजा मुंडे यांनी सगळं जग लॉकडाऊन असताना साखर उद्योग कसा सुरू राहू शकतो. उसतोड कामगारांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्न विचारला होता. आणि शरद पवार तसेच मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत २८ मार्च रोजी उसतोड मजुरांना घरी पोहचविण्याची मागणी केली.

‘उसतोड कामगार आणि इतर स्थलांतरीत कामगारांना तपासून विलगीकरण करण्यात यावे व सुखरूप घरी पोहचवावे त्यांचे वयोवृध्द आईवडील आणि लहान मुले त्यांची घरी वाट पाहत आहेत’ अशी मागणी केली होती.

यानंतर परत २ एप्रील रोजी हिच मागणी करत शासनाशी संपर्क केला. आणि उसतोड कामगारांना झालेल्या मारहाणी बाबत आपली नापसंती देखील व्यक्त केली. मुख्यमंत्र्याना बोलून अशी मारहाण होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती देखील केली. खरे तर लोक आक्रमक झाली होती. विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांच्यावर गुन्हा देखील झाला होता. मात्र पंकजा मुंडे यांनी संयम राखण्याचा सल्ला दिला.

उसतोड कामगारांचा धीर सुटत असताना त्यांना ही वेळ वशील्याची नाही असे सांगत लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. स्वतःचा संयम सुटू दिला नाही. परत एकदा ७ एप्रील रोजी प्रयत्न करत सरकारला नियोजनच दिले आणि लोकांना घरी पाठविण्याची आग्रही मागणी केली. ‘संशयीत मजूर मागे ठेवा पण लोकांना घरी जाऊ द्या’ अशी मागणी करत शरद पवार, उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली.
सरकार यावर नियोजन करत असताना परत एकदा ९ एप्रील रोजी मंत्री आणि अधिकारी यांना पत्र लिहून आग्रही मागणी केली.
शेवटी वादळ आणि पाऊस यांच्यामुळे उसतोड कामगारांची होत असलेली हेळसांड बघून त्यांनी सरकारला निर्णायक इशारा देखील दिला. या सगळ्यात सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी सरकारवर विश्वास देखील ठेवला. यावर माध्यमांनी देखील पंकजा मुंडे उध्दव ठाकरेवर विश्वास का ठेवत आहेत असा प्रश्न देखील विचारला होता.

२८ मार्च ते एप्रीलच्या मध्यापर्यंतच्या जवळपास १५ दिवसांच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सरकारने निर्णय घेत आदेश निर्गमित केले. जसाच आदेश निघाला तसे अनेकजण या आदेशाचे श्रेय घ्यायाला पुढे सरसावले.
नुसते श्रेयच नाही तर पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नाला पुतणा मावशीचे प्रेम संबोधत टिका देखील केली.
या सगळ्यात महत्वाची गोष्ट अधोरेखीत करावी लागेल. की या आदेशापूर्वी उसतोड कामगारांच्या सुटकेसाठी सतत माध्यमातून समोर येणा-या पंकजा मुंडे यांनी श्रेय घेण्याचा जराही प्रयत्न केला नाही. आदेशानंतर ‘हे मीच केले‘ असे सांगत त्या माध्यमांच्या समोर गेल्या नाहीत.
याचे कारण काय असा प्रश्न विचारल्यावर त्यांचे उत्तर देखील खुप छान होते. त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे नाकरले. अनेक वाहिण्यांच्या प्रतिनिधींना आग्रहाने मागून देखील बाईट नाकारला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, **“ही माणसे माझे भावविश्व आहेत. याच्यासाठी केलेले काम हे श्रेयासाठी नसते. तर भावनेसाठी असते.” **

याच भुमिकेतून पंकजा मुंडे श्रेय घेण्याचे गचाळ राजकारण करत पुढे आल्या नाहीत तर आता जरा शांत वाटतेय माझी माणसे घरी पोहचतील अशी भावना व्यक्त केली.
गोपीनाथ गडावर प्रेरणा आणि उर्जा घेण्यासाठी येणा-या लाखो लाखो लोकांसाठी पंकजा या त्यांच्या लोकनाथ ठरलेल्या आईनंतर खरोखरच मावशीची भुमिका पार पाडत होत्या आणि कांही लोक याला मात्र पुतणा मावशी म्हणत होते. ते देखील फक्त श्रेयासाठी हे त्याहून अधिक वाईट.