श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह.

1 min read

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह.

मंदिर परिसरात खळबळ

अयोध्या:श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती बिघडली असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नोडल अधिकारी डॉ.भुदेव सिंह यांनी याची पुष्टी केली आहे.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभाग प्रशासन आणि सरकारमध्ये खळबळ उडाली आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिएम सर्वज्ञान राम मिश्रा यांच्याशी बोलून सर्व सुविधा देण्यास सांगितले आहे.
महंत यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच त्याचे शिष्य रेल्वे रस्त्यावरील हनुमान मंदिरात जमा होऊ लागले. मंदिरात आरोग्य विभागाच्या पथकाने महंतची चाचणी केली. खोकल्यामुळे महाराजांची तब्येत बिघडली असल्याचे महंताचे शिष्य अवधेश उपाध्याय यांनी सांगितले.