शर्यत बेतली जीवावर

1 min read

शर्यत बेतली जीवावर

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहरात झालेल्या पार्टीमध्ये एका व्यक्तिने फक्त शर्यत पुर्ण करण्यासाठी अशा वस्तूचे सेवन केले की, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले.

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहरात झालेल्या पार्टीमध्ये एका व्यक्तिने फक्त शर्यत पुर्ण करण्यासाठी अशा वस्तूचे सेवन केले की, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. ३४ वर्षीय डेविड डूवेल नाव असलेल्या व्यक्तिने हा प्रयोग करून बघितला. त्याने मिञांसोबत शर्यत लावून चक्क पालच गिळून घेतील. जेव्हा त्याने हा प्रयोग केला तेव्हा त्याला काहीच झाले नाही. हळू-हळू त्या पालीचे विष त्याच्या शरीरात पसरले आणि १० दिवसानंतरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटूंबीयांनी सांगितले की, पार्टीत लावलेल्या शर्यतीत त्याने पाल गिळून घेतली होती त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला. त्याची पत्नी एलिरा ब्रिकनेलने सांगितले की, तो एक चांगला वडील होता. प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडेल असे त्याचे व्यक्तिमत्व होते. त्याचे असे अचानक जाणे खरच आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. परंतु मला अजूनही स्पष्ट होवू शकले नाही की, डेविडचा मृत्यू खरच पाल खाल्याने झाला आहे का पण त्याच्या मृत्यू पञात असे नमूद करण्यात आले आहे की, त्याने पाल गिळून घेतली होती आणि त्यामुळेच त्याला आपले प्राण गमवावे लागले.