सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची होणार दुरुस्ती !

1 min read

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची होणार दुरुस्ती !

अन्यथा या प्राणिसंग्रहालयाची मान्यता पुन्हा रद्द

वैष्णवी दंडुके/ औरंगाबाद दि.२८ : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आवश्यक दुरूस्त्या करून प्राण्यांना पोषक नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा या प्राणिसंग्रहालयाची मान्यता पुन्हा रद्द केली जाईल, असेही वर्षभरापूर्वी बजावले होते. त्यानुसार सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील किरकोळ दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. या कामांना गती देऊन ती लवकर पूर्ण करावीत, असे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतेच संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.
WhatsApp-Image-2020-10-28-at-12.24.44-PM
वाघांच्या आणि बिबट्यांच्या पिंजर्‍यात ल्या कडी किंवा सिमेंटचे फेरोक्रीट मचान बनविणे, वसुंधरा चित्रपटगृह दुरुस्त करणे, परिसराचे सौंदर्यीकरण व रंगरंगोटी करणे, प्राणिसंग्रहालयातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करणे, प्राणी वाहतूक करण्यासाठी नवीन पिंजरे तयार करणे, विविध प्राण्यांचे पिंजरे दुरुस्त करणे, परिसराची रंगरंगोटी अशा एकूण २८ कामे हाती घेतली आहेत.