तगलूर क्रार्स ते कादराबादवाडी रस्त्याची चाळणं

दररोज दुचाकी व चारचाकी गाड्यांचे छोटे-मोठे अपघात होवून नागरिक होताय जखमी...

तगलूर क्रार्स ते कादराबादवाडी रस्त्याची चाळणं

एम.एस.हुलसूरकर/हुलसूर : तालुक्यातील तगलूर क्रार्स ते कादराबादवाडी पर्यंतचा १२ कि.मी चा डांबरी रस्ता हा अपघाताचा सापळा झाला आहे. दररोज दुचाकी व चारचाकी गाड्यांचे छोटे-मोठे अपघात होवून नागरिक जखमी होत आहेत. डांबरी रस्ता हा पुर्णतः उखडल्याने खड्डे चुकवायच्या नादात अपघात होतात व रात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघातात वाढ होत आहेत. या रस्त्यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याच्या आधी दखल घेत हा रस्ता बनवा अशी मागणी स्थानिक करीत आहे.

तालुका हुलसूर आंदोलनाचे संचालक एम.जी.राजोळे यांनी कार्य निर्वाहक अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक बिदर यांच्या मार्फत कर्नाटक सरकार मुख्य चीफ सेक्रेटरी यांना निवेदन दिले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.