महाराष्ट्रात आणखी एका बुलेट ट्रेनचे संकेत

बुलेट ट्रेन मार्ग तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात तर मुंबईहून नागपूरला ३ तासात पोहोचू - रावसाहेब दानवे

महाराष्ट्रात आणखी एका बुलेट ट्रेनचे संकेत

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे आले, रेल्वे स्थानकावर उतरताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचं जल्लोषात स्वागत केले. यानंतर दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, रेल्वे मंत्री झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा मराठवाड्यात आलो. माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. त्यांनी माझा सत्कार केला. मी कार्यकर्त्यांच्या बळावर इथपर्यंत पोहोचलो. मलाही आनंद वाटला.

पुढे बोलताना दानवे यांनी रेल्वेचा मेगा प्लान सांगितला, मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं. मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर-मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो. तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला ३ तासात आपण पोहचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना एक सादरीकरण तयार करायला सांगितलं आहे. मी गेल्यावर हे सादरीकरण पाहून पुढील कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रेल्वे राज्यमंत्रिपद आल्यामुळं मतदारांच्या व महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढल्याबद्दल ते म्हणाले, 'माझं मूल्यमापन जालना, औरंगाबाद, भोकरदन, मराठवाडा किंवा महाराष्ट्रातील कामाच्या आधारे होऊ नये. मी देशाचा मंत्री आहे. मी मंत्री झालो आणि माझ्या गावातच रेल्वे नाही असं म्हणून चालणार नाही. देशात आम्ही नवीन काय करतो आहोत यावर मंत्री म्हणून माझं मूल्यमापन व्हायला हवं,' असंही ते म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.