सिंधू 'बीडब्लूएफ' अ‍ॅथलिट आयोगाची निवडणूक लढवणार

सिंधू 'बीडब्लूएफ' अ‍ॅथलिट आयोगाची निवडणूक लढवणार

नवी दिल्ली- ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही.सिंधू ही जागतिक बॅडमिंटन फेडरेशन अ‍ॅथलिट आयोगाची निवडणूक लढणार आहे.१७ डिसेंबर रोजी स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलिट आयोगामार्फत घेण्यात येणारी निवडणूक लढणार आहे. बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलिट आयोगाच्या निवडणुकीतील सहा पदांसाठी नामांकन भरणाऱ्या नऊ खेळाडूंपैकी सिंधू एक आहे.बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलिट आयोगाच्या निवडणुकीतील सहा पदांसाठी नामांकन भरणाऱ्या नऊ खेळाडूंपैकी सिंधू एक आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये ही निवडणूक लढली होती. सध्याच्या कार्यकाळामध्ये सिंधू ही सहा महिला प्रतिनिधींपैकी एक होती, असंही आयोगाने स्पष्ट केलंय.२६ वर्षीय सिंधूबरोबरच इंडोनेशियाची महिला खेळाडू ग्रेसिया पोली सुद्धा निवडणूक लढणार आहे. तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. मे महिन्यामध्ये आईओसीने बिलिव्ह इन स्पोर्ट्स या मोहिमेसाठीही सिंधूची अ‍ॅथलिट आयोगाने निवड केली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.