सोनपेठ मधील सहा जणांची कोरोनावर मात.

1 min read

सोनपेठ मधील सहा जणांची कोरोनावर मात.

रुग्ण झाले भावुक कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण भावूक झाले होते. योग्य उपचार, रूग्णांची घेतलेली काळजी याबद्दल कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टर परिचारीका व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतांना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ येथे उपचारासाठी दाखल असलेल्या सहाजणांनी कोरोनावर यशस्वी मात करुन आपल्या घरी परतले आहेत. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या .
सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ईमारती मध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आधी या ठिकाणी फक्त विलगीकरण कक्ष होता व संशयित रुग्णांना येथे विलगीकरणासाठी ठेवण्यात येत होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येते. आतापर्यंत 10 कोरोना बाधीत रुग्णांना ठेवण्यात आले होते. यातील सहा रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याची कोविड चाचणी निगेटिव्ह आली. त्यांना रुग्णालयातून दि.३० रोजी घरी सोडण्यात आले.
तालुका प्रशासनाच्या वतीने परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णालय अधिक्षक डॉ सिध्देश्वर हालगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार,रवींद्र देशमुख,सुधीर बिंदू,सिध्देश्वर गिरी, डॉ सचिन कस्पटे,डॉ कपिल महाजन, मेनका लांडे ,मिनल भदाडे ,नेहा पवार ,साईनाथ पांचाळ गृहरक्षक दलाचे मस्के यांच्या सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
WhatsApp-Image-2020-08-30-at-3.58.40-PM--1-
रुग्ण झाले भावुक
कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण भावूक झाले होते. योग्य उपचार, रूग्णांची घेतलेली काळजी याबद्दल कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टर परिचारीका व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतांना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी कोविड सेंटर मधील विलगीकरण कक्षास भेट देऊन. तिथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांची चौकशी केली व योग्य त्या सोईसुविधा पुरवण्यासाठी सुचना दिल्या. कोविड सेंटरवर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन विचारपुस केल्या बद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले.