केवळ सात दिवसात सोळा लाखांची अफरातफर

औराद शा.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकिय संचालकाचा महाप्रताप

केवळ सात दिवसात सोळा लाखांची अफरातफर

निलंगाः लातूर जिल्हामध्ये आर्थिक दृष्ट्या उलाढाल मोठी उलाढाल म्हणून औराद शा.कृषी उत्पन्न बाजार समितीचा तिसरा क्रमांक लागतो बाजार समितीच्या अशासकीय संचालक मंडळाने पंधरा दिवसात तीन बैठका घेऊन, केवळ सात दिवसामध्ये बाजार समितीच्या खात्यातील नियमबाह्य १६ लाख रूपये उचलून अफरातफर केल्याच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधक निलंगा यानी उपनिबंधक लातूर यांच्या आदेशाने चौकशी सुरू केली. असून संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

भाजप सेना युतीची सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले जिल्ह्यातील ज्या बाजार समितीच्या निवडणूका होणार आहेत अशा बाजार समितीच्या निवडणूका पुढे ढकलून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या कार्यकर्त्यांना पालकमंञ्याच्या शिफारशीवरून अशासकीय संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. अशाच प्रकारे औराद शा.कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक उलाढाल मोठी असल्यामुळे अशासकीय संचालक म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती त्या अनुशंगाने सहा जणांची अशासकीय संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यात हाजीद्दीन रियाजोद्दीन सराफ गंगाधर मोहनराव चव्हाण लक्ष्मण व्यंकट कांबळे श्रीनिवास मगरध्वज सुर्यवंशी संजीव तुकाराम बडूरे बस्वराज विश्वनाथ वलांडे या सहा जणांचा समावेश आहे.अशासकीय प्रशासक मंडळ म्हणून निवड झाल्यानंतर या प्रशासक मंडळाने १३ मे रोजी बाजार समितीचा पदभार स्वीकारून हाजीद्दीन सराफ यांना सहीचे अधिकार दिले. लागलीच २१ मे रोजी दुसरी बैठक घेऊन सुचना रजिस्टर न काढता बैठक अजेंडा पटलावर न ठेवता पाच सदस्यानी नियमबाह्यरित्या उपनिबंधक लातूर यिंची परवानगी नसताना वेगवेगळ्या तारखात केवळ सात दिवसामध्ये १६ लाख रूपयांची अफरातफर केली.

असून सदर रक्कमेचा ताळमेळ लागत नाही तसेच ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर उपनिबंधकाची परवानगी लागते परंतु कोणतीही परवानगी न घेता तत्कालीन सचिव राजेंद्र तांबाळे व हाजीद्दीन सराफ यांच्या स्वाक्षीरीने ही रक्कम काढली असून बाजार समितीतील अंतर्गत मुलभूत सुविधा करण्यासाठी तात्पुरते स्वरूपात हाजीद्दीन सराफ याना देण्यात आले.माञ या बैठकीत पाच संचालक उपस्थित असले तरी चार सदस्यानी ही रक्कम काढण्यात यावी म्हणून सदर ठरवाला मंजूरी दिली आहे.त्यामध्ये लक्ष्मण कांबळे गंगाधर चव्हाण श्रीनिवास सुर्यवंशी यांचा समावेश आहे.हा प्रकार लक्षात येताच अशासकीय संचालक बस्वराज वलांडे यानी समितीचे संचालक यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर व पनन संस्था पूणे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.जिल्हा उपनिबंधक लातूर यानी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून स्वंयस्पष्ट अहवाल सादर करावा असा आदेश सहाय्यक निबंधक निलंगा याना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.याबाबत बस्वराज वलांडे यानी ५० हजारापेक्षा परवानगी नसताना नेमके कोणत्या धरतीवर ही रक्कम उचली असा सवाल केला असून संबंधित संचालकावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. बाजार समितीच्या आर्थिक उन्नतीसाठी तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय मंडळ म्हणून नियुक्त केले असले तरी या संचालक मंडळाकडून समितीचे हित जोपासण्यासाठी रक्षक म्हणून कार्य करण्यापेक्षा भक्षक झाल्याची चर्चा जास्त रंगत आहे.

मुलभूत सुविधेच्या नावाखाली बाजार समितीच्या अंतर्गत रस्त्याची डागडूजी खडक टाकून थातूरमातूर दुरूस्ती केली. असून समितीच्या संचालक मंडळाने नाममात्र रक्कमेत डागडूजी केली. असली तरी उर्वरित रक्कम आपआपसात वाटून घेटल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात चवीने सुरू आहे.सहाय्यक निबंधकाच्या चौकशीनंतर झालेल्या अफरातफरी बाबत फौजदारी गुन्हे दाखल होणार का याची उत्सुकता लागली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.