देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ

देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता दीड लाखांच्या आसपास आहे.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णंसख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात १६ हजार १५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल ७३३ कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कालच्या दिवसात देशात १७ हजार ९५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ४२ लाख ३१ हजार ८०९ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख १४ हजार ४३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ५६ हजार ३८६ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. १ लाख ६० हजार ९८९ इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १०४ कोटी ४ लाख ९९ हजार ८७३ च्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.