स्मार्ट सिटी बससेवा ५ नोव्हेंबरपासून शहरवासीयांसाठी खुली - पालकमंत्री सुभाष देसाई

1 min read

स्मार्ट सिटी बससेवा ५ नोव्हेंबरपासून शहरवासीयांसाठी खुली - पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनविण्याच्या द्ष्टीने नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक.

सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने येत्या ५ नोव्हेंबर पासून स्मार्ट सिटी बस नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.
सुभाष देसाई यांनी शहरातील महानगरपालिकेच्या कामांचा आढावा हॉटेल रामा येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, श्री. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापण कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे,आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, मुख्य लेखाधिकारी संजय पवार तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनविण्याच्या द्ष्टीने नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सध्या शहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत आहे. येत्या 5 नोव्हेबर पासून स्मार्ट बस सुरु होत असल्याने नागरिकांना वाहतुकीची स्मार्ट सुविधा मिळणार आहे.